aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

प्रशासनात पारदर्शकता आणि गती आणणार नांदेड जिल्हा परिषदेत ई-ऑफिस आणि बायोमेट्रिक प्रणाली लागू

Aawaz Times by Aawaz Times
August 8, 2026
in आपलं नांदेड
0
प्रशासनात पारदर्शकता आणि गती आणणार नांदेड जिल्हा परिषदेत ई-ऑफिस आणि बायोमेट्रिक प्रणाली लागू
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी : माधव वाघमारे नांदेड (दि. ८ ऑगस्ट २०२६)

जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची टप्प्याटप्प्याने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी प्रशासकीय कामकाज व आगामी विकास योजनांबाबत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:

  • तीन टप्प्यांत ई-ऑफिस प्रणाली: गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्हा परिषदेत ई-ऑफिसची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३,६०० पत्रांचे स्कॅनिंग करून ई-प्रणालीद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात मुख्यालय, दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तर आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर ही प्रणाली लागू केली जाईल. यामुळे फाइल्स आणि तक्रारींचा अचूक मागोवा घेता येऊन कामांचा जलद निपटारा होईल.
  • वेतनाशी जोडणार बायोमेट्रिक उपस्थिती: कार्यालयीन शिस्त आणि वेळेचे पालन सुधारावे यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरू केली जाणार आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवून ही प्रणाली थेट वेतन प्रक्रियेशी जोडली जाईल.
  • घरकूल बांधकामाला गती: महेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यात १२,६२७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात यश आले आहे.
  • घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन: ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कचऱ्याचे विलगीकरण व वर्गीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती केली जाईल.
  • विविध विभागांचे अभिसरण: आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि ‘उमेद’ अभियानाच्या अभिसरणातून (Convergence) विविध विकास उपक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नांदेड जिल्ह्याला राज्याच्या आघाडीच्या टक्केवारीच्या बरोबरीने आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे
आपलं नांदेड

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा
आपलं नांदेड

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा

August 21, 2026
जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
आपलं नांदेड

जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 21, 2026
सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश
आपलं नांदेड

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

August 17, 2026
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला
आपलं नांदेड

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

August 16, 2026
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती
आपलं नांदेड

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

August 15, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved