aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, August 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, August 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

Aawaz Times by Aawaz Times
August 7, 2026
in आपलं नांदेड
0
सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  ७ जुलै (विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे)

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको-हडको क्षेत्रीय कार्यालय क्र.०६ अंतर्गत येणाऱ्या विविध गंभीर नागरी समस्यांवर नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ०७ ऑगस्ट) आढावा बैठक पार पडली. पाणी पुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण, रस्ते आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या ढिसाळ कारभारावरून बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर अहवाल न दाखवता प्रत्यक्ष जमिनीवर काम करून दाखवावे, अन्यथा प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा महापौरांनी यावेळी दिला.

या बैठकीला स्थानिक नगरसेवक संजिव घोगरे, संजय मोरे, अभिषेक सौदे, काळे पाटील, काकडे, महापौर प्रतिनिधी संतोषभाऊ मुळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुंकेवार, उपायुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता सतीश ढवळे, क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग आणि कनिष्ठ अभियंता ठाणेदार यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व दिलेले निर्देश:

  • पाणी पुरवठा व नवीन लाईन: सिडको-हडको भागात होणाऱ्या विस्कळीत व उशिरा होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले होते. वाढत्या लोकवस्तीचा विचार करता नवीन पाणी पुरवठा लाईन टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर महापौरांनी मुख्य जलवाहिन्यांची गळती शोधून तात्काळ दुरुस्ती मोहीम राबवण्याचे व नगरसेवकांशी समन्वय साधून नवीन लाईनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
  • मलनिस्सारण व गटारे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुंबलेल्या मलनिस्सारण वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
  • स्वच्छता व घंटागाडी: सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता व मनुष्यबळ वाढवण्याच्या मागणीवर महापौरांनी अंतर्गत रस्त्यांवरील कचरा दररोज वेळेवर उचलणे, प्रत्येक गल्लीत नियमित घंटागाडी पाठवणे आणि ओला-सुका कचरा वर्गीकरण करून घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले.
  • रस्ते दुरुस्ती व बांधकाम दर्जा: सिडको-हडकोतील खराब रस्ते आणि खड्डे तात्काळ बुजवून प्रवास सुरक्षित करावा. अपूर्ण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करताना कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
  • पथदिवे व सुरक्षितता: बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करून नवीन तंत्रज्ञानाचे LED दिवे बसवण्याच्या कामाला गती द्यावी, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिकांची सुरक्षितता कायम राहील.

लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या नागरी समस्यांची गंभीर दखल घेत महापौरांनी प्रशासनाला कामाचा प्रत्यक्ष प्रगती अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते
आपलं नांदेड

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

August 7, 2026
आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

August 7, 2026
नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

August 7, 2026
मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 6, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved