aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

Aawaz Times by Aawaz Times
September 17, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दुष्काळसदृश्य परिस्थितीत

नांदेड १७ सप्टेंबर (प्रतिनिधी: माधव वाघमारे)

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत राज्य शासन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर तीव्र पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पिकांचे नुकसान व उपाययोजनांचा आढावा पावसाचा दीर्घ खंड आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर या मुख्य पिकांना मोठा फटका बसला असून पिकांची वाढ खुंटली आहे. या संभाव्य पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना व सादरीकरण:

  • परस्पर समन्वय: दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून आत्तापासूनच ठोस नियोजन करावे.
  • पाणीसाठा व पिण्याचे पाणी: धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे, जेणेकरून भविष्यात टंचाई भासणार नाही.
  • जिल्हा प्रशासनाची तयारी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पाणी आराखडा, चारा लागवड, के.टी. वेअर बंधारे आणि नियमित वीजपुरवठ्याबाबत प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

शेतकऱ्यांना व नागरिकांना या कठीण प्रसंगात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी तत्परतेने काम करावे, अशा सूचना देऊन पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला दिलासा दिला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
नांदेडमध्ये सखल मातंग समाजाचा एल्गार विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धडकला महामोर्चा
आपलं नांदेड

नांदेडमध्ये सखल मातंग समाजाचा एल्गार विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धडकला महामोर्चा

September 13, 2026
Next Post
नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved