नांदेड २८ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे)
जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि एजन्सी धारकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ग्राहकांना गॅससाठी एजन्सीवर बोलावू नका, तर त्यांना ‘होम डिलिव्हरी’ देणे बंधनकारक असेल.
होम डिलिव्हरी बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले की, सर्व गॅस एजन्सी धारकांनी ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच सिलिंडर पोहोचवणे आवश्यक आहे. ग्राहकांना एजन्सीवर येण्यास प्रवृत्त करू नये. जर होम डिलिव्हरी मिळण्यास काही अडचण येत असेल, तर प्रत्येक तालुक्यातील निरीक्षण अधिकारी (नायब तहसीलदार पुरवठा) यांची नियुक्ती करण्यात आली असून ग्राहक त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात.
तालुकावार संपर्क क्रमांक:
- नांदेड: ७०३०७७३०४० | अर्धापूर/हदगाव: ८८०५०६८९५४
- मुखेड: ९३५६८०६४०५ | धर्माबाद: ९४२१८४१४४७
- लोहा: ९६५७२२४०४२ | देगलूर: ९४२३८०५०६४
(इतर तालुक्यांच्या संपर्कासाठी प्रशासकीय यादी पहावी)
e-KYC साठी एजन्सीवर जाण्याची गरज नाही; घरबसल्या करा प्रक्रिया
अनेक ग्राहक बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणासाठी (e-KYC) एजन्सीवर गर्दी करत आहेत. मात्र, ही प्रक्रिया मोबाईलद्वारे घरबसल्या पूर्ण करता येते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अशी करा e-KYC प्रक्रिया: - Aadhaar Face RD हे ॲप प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करा.
- तुमच्या कंपनीचे अधिकृत ॲप (Indane साठी IndianOil ONE, Bharat Gas साठी Hello BPCL, HP साठी HP Pay) डाऊनलोड करा.
- ॲपमधील ‘Aadhaar e-KYC’ पर्यायावर जाऊन चेहरा स्कॅन करा आणि पडताळणी पूर्ण करा.
- अधिक माहितीसाठी pmuy.gov.in/e-kyc.html या लिंकला भेट द्या.
काही तांत्रिक अडचण आल्यास ग्राहक खालील सेल्स ऑफिसर्सशी संपर्क साधू शकतात: - BPCL (मनोजकुमार राणा): ९१३००८४७४६
- IOCL (जय सिंघ): ९५६१३६६८९३
- HPCL (सचिनकुमार): ९५९४८२०६६५
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यान्वित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा गॅस संपण्याच्या भीतीने एजन्सीवर गर्दी करून गोंधळ घालू नये. “प्रशासनाने केलेल्या नियोजनाला सहकार्य करा आणि संयम राखा,” असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
महत्त्वाची टीप: गॅस बुक केल्यानंतर तो आपल्या दारात पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गॅस एजन्सीची आहे.












