नांदेड २९ जुन ( प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने एकाच रात्रीत धडक मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २८ जून २०२६ रोजीच्या रात्री ११:०० वाजेपासून ते २९ जून २०२६ च्या पहाटे ०३:०० वाजेपर्यंत संपूर्ण नांदेड शहरात एकाच वेळी भव्य “कोंबिंग ऑपरेशन” (Combing Operation) राबवण्यात आले. या धडक कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगार, तडीपार आणि अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या धडक मोहिमेमध्ये अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर व इतवारा), स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे पोलीस निरीक्षक, तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार आणि आरसीपी (RCP) चे जवान अशा एकूण ३७ अधिकारी आणि १४६ पोलीस अंमलदारांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ही कारवाई केली.
एकाच रात्रीत झालेली धडक कारवाई खालीलप्रमाणे:
- तडीपार गुन्हेगारांची तपासणी: कलम ५५, ५६, ५७ मधील तब्बल २७ तडीपार गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली.
- एमपीडीए (MPDA) मधील गुन्हेगार: कारागृहातून व जामिनावर सुटलेल्या २९ गुन्हेगारांची हालचाल तपासण्यात आली.
- सराईत गुन्हेगारांची धरपकड: मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या एकूण ५७ सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले.
- अवैध शस्त्र बाळगणारे (आर्म ॲक्ट): बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या ०३ गुन्हेगारांवर आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
- फरारी आरोपींना बेड्या: गुन्ह्यात पाहिजे असलेल्या व फरार असलेल्या ०४ आरोपींना अटक करण्यात आली.
- मपोका (महाराष्ट्र पोलीस कायदा) कारवाई: कलम १२२ अन्वये संशयास्पद रित्या फिरणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या १३ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
- न्यायालयीन वॉरंट बजावणी: एकूण ३० वॉरंट बजावण्यात आले, ज्यामध्ये १८ जामीनपात्र (BW) आणि १२ अजामीनपात्र (NBW) वॉरंटचा समावेश आहे. तसेच ०४ समन्स देखील बजावण्यात आले.
विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेले गुन्हे व आरोपी:
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील मुख्य पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे:
१. भाग्यनगर पो.स्टे.: आर्म ॲक्ट अंतर्गत १ गुन्हा (गु.र.नं. ३३७/२६) व मपोका अंतर्गत २ गुन्हे (गु.र.नं. ३३५/२६, ३३६/२६) नोंदवून ३ आरोपींवर कारवाई.
२. नांदेड ग्रामीण पो.स्टे.: आर्म ॲक्ट अंतर्गत ३ गुन्हे (गु.र.नं. ७८७/२६, ७८८/२६, ७८९/२६) आणि मपोका अंतर्गत ३ गुन्हे (गु.र.नं. ७९०/२६, ७९१/२६, ७९२/२६) नोंदवून एकूण ६ आरोपींना जेरबंद केले.
३. शिवाजीनगर पो.स्टे.: मपोका कलम १२२ अन्वये २ गुन्हे (गु.र.नं. २९७/२६, २९८/२६) दाखल करून २ आरोपींवर कारवाई.
४. इतवारा पो.स्टे.: मपोका अंतर्गत ३ गुन्हे (गु.र.नं. २२५/२६, २२६/२६, २२७/२६) दाखल करून ३ आरोपींना ताब्यात घेतले.
५. वजिराबाद पो.स्टे.: मपोका अंतर्गत २ गुन्हे (गु.र.नं. ३१७/२६, ३१८/२६) नोंदवून २ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलीस दलाच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे नांदेड शहरातील सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.












