aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, August 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, August 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 7, 2026
in क्राईम
0
मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुखेड /  ७ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून, विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर मुखेड पोलीस पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ४० लाख रुपयांचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू, असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी नरसी ते मुखेड जाणाऱ्या रोडवर एका हायवा टिप्पर (क्र. MH-04-JU-0486) मधून अवैध वाळूची (रेती) वाहतूक केली जात असल्याची बातमी मुखेड पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने नरसी-मुखेड मार्गावर सापळा रचून सदर हायवा अडवला आणि त्याची कसून पाहणी केली.

तपासादरम्यान हायवा चालक उद्धव रामचंद्र भरकडे (वय ३० वर्षे, रा. कौडगाव, ता. लोहा) याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असणारी रॉयल्टी किंवा कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. वाहनात अंदाजे ५ ब्रास वाळू भरलेली होती. अधिक चौकशी केली असता सदर हायवा वाहनाचा मालक कृष्णाजी दशरथ भरकडे (रा. कौडगाव, ता. लोहा, जि. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी चालक उद्धव भरकडे व मालक कृष्णाजी भरकडे या दोघांविरोधात पोलीस ठाणे मुखेड येथे गु.र.नं. २४५/२०२६ कलम ३०३(२) BNS सह कलम ४८(७), ४८(८) जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने, देगलूरचे पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चिंतांबर कामठेवाड, पोउपनि. संदीप यामावार तसेच पोलीस अंमलदार यादव इबितवार, धम्मा सोनकांबळे, रविंद्र भुले व सुरज गाजलवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 6, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
Next Post
नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

सिडको-हडकोत नागरी समस्यांचा फटका महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिले कडक निर्देश

August 7, 2026
नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

नांदेड मंडळात हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न परिचालन विभाग ठरला विजेते

August 7, 2026
मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड पोलिसांची नरसी-मुखेड रस्त्यावर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 6, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved