aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नरशी येथील लॉजवर चालणाऱ्या कुंटणखान्यावर नांदेड पोलिसांचा छापा ७ महिलांची सुटका १० आरोपींना अटक

Aawaz Times by Aawaz Times
July 25, 2026
in क्राईम
0
नरशी येथील लॉजवर चालणाऱ्या कुंटणखान्यावर नांदेड पोलिसांचा छापा ७ महिलांची सुटका १० आरोपींना अटक
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नरशी / नांदेड २५ जुलै प्रतिनिधी
नरशी (ता. रामतीर्थ) येथील बसस्थानकासमोरील अर्शर्वाद लॉज आणि आनंद लॉज येथे छुपेपणाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांनी संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली. या कारवाईत ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून १० आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

बोगस गिऱ्हाईक पाठवून टाकली धाड

नरशी येथील बसस्थानकासमोरील लॉजचा मालक पांडुरंग शिवराम श्रीगिरि हा बाहेरील राज्यातील व राज्यातील इतर भागांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून, जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी शासकीय पंचांसमक्ष दोन सामाजिक कार्यकर्त्यांना ‘बोगस गिऱ्हाईक’ म्हणून लॉजवर पाठवले. वेश्यागमनासाठी इसम निश्चित होताच इशारा मिळताच पोलीस पथकाने दोन्ही लॉजवर अचानक छापा टाकला.

१० आरोपींना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

छाप्यादरम्यान पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले:
१) राहुल यशवंता कोलते (वय ४०, रा. चिलपिंपरी, मुखेड)
२) विश्र्वांबर व्यंकटी गाडे (वय ३४, रा. चिलपिंपरी, मुखेड)
३) बालाजी आनंदा सूर्यवंशी (वय ३२, रा. नरशी)
४) खाकीबा शिवाजी सूर्यवंशी (वय २६, रा. नरशी)
५) पांडुरंग शिवराम श्रीगिरि (वय ६६, लॉज मालक, रा. नरशी)
६) नरसिंग बाबुसिंग ठाकूर उर्फ परदेशी (वय २५, रा. नरशी)
७) प्रविण दत्तु वारनलवार (वय २०, रा. मदनूर)
८) कृष्णा बालाजी देशपिठवार (वय ३२, रा. तेल्लुर)
९) व्यंकट माधव नारे (वय ४०, रा. नरशी)
१०) विक्की विनोद ईंदुरकर (वय ३८, रा. हडको, नांदेड)
या कारवाईदरम्यान नांदेड व पश्चिम बंगाल येथील ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून रोकड, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण २,०४,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्र्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५३/२०२६ नुसार ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६’ चे कलम ३, ४, ५, ६ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

सदर कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक वैभव पडवळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, रामतीर्थचे सपोनि विक्रम हराळे, पोउनि साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे तसेच पोलीस अंमलदार कवठेकर, बामणे, शेख उमर, लोसरवार, कुलथे, अझरोद्दीन, बिरादार, स्वामी, माने, राठोड, जोंधळे, जाधव, लोणे, देवकत्ते, मपोकॉ/सूर्यवंशी, मपोकॉ केंद्रे व AHTU च्या महिला पो.उप.नि अश्र्विनी गायकवाड व पोहेकॉ मोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अकृषिक परवानग्या आणि जमीनविषयक प्रकरणे वेळेत निकाली काढा नावीन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या विभागीय आयुक्त जी श्रीकांत

Next Post

नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाचा धडक धडक कारवाईचा बडगा ५१ लाखांची सायबर फसवणूक घरफोडी जुगार आणि अवैध दारू विक्रीवर गुन्हे दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाचा धडक धडक कारवाईचा बडगा ५१ लाखांची सायबर फसवणूक घरफोडी जुगार आणि अवैध दारू विक्रीवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved