aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये हुल्लडबाजांवर पोलिसांचा मोठा हल्लाबोल

Aawaz Times by Aawaz Times
June 24, 2026
in क्राईम
0
नांदेडमध्ये हुल्लडबाजांवर पोलिसांचा मोठा हल्लाबोल
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २३ जून प्रतिनिधी
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या, आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या आणि महिला व नागरिकांना त्रास देणाऱ्या १४ हुल्लडबाजांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ आणि ‘दामिनी पथका’ने २२ जून २०२६ रोजी शहराच्या विविध भागांत ही धडक मोहीम राबवली. या सर्व आरोपींवर मुंबई पोलीस कायदा (मपोका) कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एन. जी. पोमनळकर व चॉर्ली पोलीस अंमलदारांनी शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग करून ही कारवाई केली.

विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेली कारवाई खालीलप्रमाणे:

  • भाग्यनगर परिसर: चॉर्ली क्रमांक १, २ आणि ३ च्या पथकाने भगीरथ नगर, जिरायत मैदान आणि सत्कार वाईन शॉप परिसरात पेट्रोलिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या ३ इसमांना ताब्यात घेतले. तसेच हद्दीतील दारूची दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स आणि शाळा-कॉलेज परिसराची तपासणी केली.
  • इतवारा (जुना मोंढा): मॅपको रोड आणि जुना मोंढा भागात चॉर्ली क्रमांक २ व ३ च्या पथकाने सर्वाधिक म्हणजेच ५ जणांवर सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातल्याप्रकरणी कारवाई केली.
  • दामिनी पथकाची कारवाई: महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दामिनी पथकाने वृंदावन कॉलनी आणि विसावा गार्डन परिसरात आरडाओरड करणाऱ्या ३ हुल्लडबाजांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले.
  • शिवाजीनगर: अण्णाभाऊ साठे चौक येथे सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या १ इसमावर कारवाई करण्यात आली.
  • विमानतळ हद्द: सांगवी परिसरात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या १ इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • वजिराबाद: न्यायालय परिसर आणि परिसरात चॉर्ली क्रमांक २ च्या अंमलदारांनी १ इसमावर कारवाई केली.

पोलीस अधीक्षकांचे कडक आवाहन:
“नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करू नये. तसेच दारू पिणाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिला आहे.

या कारवाईमुळे नांदेडमधील टवाळखोर आणि मद्यपींचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी विशेषतः महिलांनी पोलिसांच्या या धडक मोहिमेचे स्वागत केले आहे.
विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

बॅनरबाजीला फाटा विजयी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी पाळले नियमांचे कोंदण शहरात चर्चा आणि कौतुक

Next Post

सिंघम आयपीएस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
सिंघम आयपीएस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

सिंघम आयपीएस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved