aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून ३५ हजारांची स्कूटी जप्त

Aawaz Times by Aawaz Times
January 2, 2026
in क्राईम
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी प्रभावी कारवाई करत जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीकडून अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीची एक ऑरेंज रंगाची स्कूटी जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्रीमती अर्चना पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड तसेच पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी बजावली.

दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीस गेलेली स्कूटी नांदेड शहर परिसरात वापरात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार संशयित इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सदर आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक ऑरेंज रंगाची स्कूटी हस्तगत करण्यात आली. या स्कूटीची किंमत अंदाजे ३५,००० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन बारड येथे गुन्हा क्रमांक ११३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

समन्वयातूनच विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल  सीईओ मेघना कावलींचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Next Post

सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नांदेड शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नांदेड शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved