aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये स्ट्रीट सेफ्टी पथकाची मोठी कारवाई अवैध खंजरसह फिरणाऱ्या तिघांना बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
April 25, 2026
in क्राईम
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २५ एप्रिल प्रतिनिधी

नांदेड शहरात सुरक्षितता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्ट्रीट सेफ्टी पथकाने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी खंजर जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी स्ट्रीट सेफ्टी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार शहरात कोम्बिंग ऑपरेशन व गस्त घालत होते. यावेळी माळटेकडी ब्रिज परिसरात एक इसम अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सुनीलसिंग दर्शनसिंग दुधानी (वय २६, रा. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १००० रुपये किमतीचा एक लोखंडी खंजर मिळून आला.

अंधारात दबा धरून बसलेले दोघे ताब्यात

याच गस्ती दरम्यान माळटेकडी परिसरात दोन व्यक्ती अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवून, संशयास्पदरीत्या दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे अर्जुनसिंग धारासिंग दुधानी (वय ३१) आणि किरपालसिंग गुरुबच्चनसिंग दुधानी (वय २६, दोन्ही रा. साखला प्लॉट, परभणी) अशी सांगितली. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल व पोलीस पथक

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ आणि मपोका कलम १२२ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे (गु.र.नं. १७५/२०२६ आणि १७६/२०२६) दाखल करण्यात आले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कु अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली, स्ट्रीट सेफ्टी पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे, पोउपनि खंडू दर्शने, नितीन वाघमारे, प्रशिक्षक हाटकर, कपिल सूर्यवंशी, हरिसिंग राठोड आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांनी या कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल

Next Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट  १६ दिवसांत १४८ हून अधिक गुन्हेगारांवर दणकेबाज कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट  १६ दिवसांत १४८ हून अधिक गुन्हेगारांवर दणकेबाज कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved