aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

Aawaz Times by Aawaz Times
May 19, 2026
in क्राईम
0
नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘

प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड १९ मे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि लातूर येथील नामांकित ‘आरसीसी’ (रेणुकाई कोचिंग सेंटर) चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी या प्रकरणात प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि प्रा. मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली असून, आता मोटेगावकर यांच्या अटकेमुळे या रॅकेटचे धागेदोरे आणखी गडद झाले आहेत.

स्वतःच्या मुलासाठी फोडला पेपर?

सीबीआयने गेल्या दोन दिवसांत केलेल्या कसून चौकशीत मोटेगावकर यांच्याविरोधात अत्यंत भक्कम पुरावे हाती आले आहेत. मोटेगावकर यांनी चक्क स्वतःच्या मुलासाठीच नीटचा पेपर फोडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. सीबीआयने लातूर येथील शिवराज मोटेगावकर यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठे यश आले असून, घरझडतीदरम्यान त्यांच्या घरातून चक्क ‘केमिस्ट्री’ (रसायनशास्त्र) या विषयाची नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका हस्तगत करण्यात आली आहे.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० दिवस आधीच पेपर लीक

तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, ५ मे रोजी देशभरात नीटची परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेच्या तब्बल १० दिवस आधीच म्हणजेच २३ एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकर याने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती.

न्यायाधीशांचे थेट प्रश्न आणि सीबीआयचा खुलासा

सुनावणीदरम्यान सीबीआय कोर्टात न्यायाधीश आणि तपास अधिकारी यांच्यात झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला.

न्यायाधीश: “मोटेगावकरकडेच प्रश्नपत्रिका आहेत, हे तुम्हाला कसे कळाले?”
तपास अधिकारी पवन कौशिक: “या प्रकरणातील संशयित निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकरच्या सतत संपर्कात होता. त्यांच्यातील कॉल रेकॉर्ड्स आणि संवादाद्वारेच ही बाब समोर आली आहे.”

प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे कनेक्शन

नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून अटक करण्यात आलेला निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा मूळचा प्रश्नपत्रिका सेटर (Paper Setter) होता. तो लातूरमधील एका नामांकित कॉलेजमधून निवृत्त झाला होता. विशेष म्हणजे, त्याने काही काळ शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’ कोचिंग क्लासमध्ये अध्यापनही केले होते. मध्ये काही काळ त्यांच्यात मतभेद झाले होते, मात्र नंतर पुन्हा त्यांचे सूत जुळले. हे दोघेही या पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे.

प्रा. मनीषा मांढरेला १४ दिवसांची कोठडी

याच प्रकरणातील दुसरी संशयित आरोपी प्रा. मनीषा मांढरे हिला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर असलेल्या मनीषा मांढरे हिची दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, मांढरे ही ‘एनटीए’च्या (NTA) पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती. त्यामुळे परीक्षेत कोणते प्रश्न येणार, याची तिला आधीच पूर्ण कल्पना होती. तिने या माहितीचा वापर करून पुण्यात विशेष कोचिंग क्लास चालवला होता.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करत असून, यामध्ये आणखी काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved