aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
May 18, 2026
in Uncategorized
0
गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १८ प्रतिनिधी

जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर छापा टाकून तब्बल १,००,२५,००० रुपये (एक कोटी पंचवीस हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे छापा

पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत होते.
१७ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास, मौजे इंजेगाव आणि बोंढार शिवारातील गोदावरी नदीपात्रात काही इसम बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा करून तराफ्याच्या साहाय्याने काठावर आणत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला.

बोट आणि क्रेनसह मुद्देमाल जप्त

पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी क्रेनच्या साहाय्याने रेती उपसा करणारी बोट आयशर वाहनात टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना रंगेहात पकडले. पंचसमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • एक बोट आणि ६ इंजिन
  • २० तराफे
  • ५ ब्रास रेती
  • एक आयशर वाहन (पासिंग क्र. MH 26 BE 7393)
  • एक ACE कंपनीची क्रेन (पासिंग क्र. MH 26 BQ 2693)
  • एकूण किंमत: १,००,२५,०००/- रुपये

पाच आरोपींवर गुन्हे दाखल

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोकॉ/१५०० गवेंद्र गंगाधर सिरमलवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ५७७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७)(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई झालेल्या आरोपींची नावे:
१) माधव मोतीराम जाधव (वय २५, रा. हिंडोळा, ता. लोहा)
२) इंद्रजित सिंग केसर सिंग सोखी (वय ४३, रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड)
३) शेख अजीम शेख सलीम (वय २८, रा. खुदबे नगर, नांदेड)
४) पिंटू पाटील तिडके (रा. बोंढार, ता. जि. नांदेड)
५) एक अज्ञात चार इसम

या पोलीस पथकाने केली कामगिरी

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, अंमलदार आसिफ अली, विष्णू कल्याणकर, संतोष पवार आणि गवेंद्र सिरमलवार यांच्या पथकाने केली.
पोलीस पथकाच्या या धडक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

– प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

Next Post

नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Uncategorized

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा
Uncategorized

नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा

September 9, 2026
कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका
Uncategorized

कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका

September 4, 2026
देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त
Uncategorized

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त

September 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

August 14, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
Next Post
नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved