aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

Aawaz Times by Aawaz Times
May 18, 2026
in आपलं नांदेड
0
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0021,0.0001; brp_del_sen:0.1300,0.1300; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 253.04758;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?Hazy sunshine, icon:14, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: bright;

0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १८ मे प्रतिनिधी
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाविरोधात आता नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या शिक्षण व्यवस्थेवरील ढासळत चाललेल्या विश्वासामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या प्रचंड असंतोषाला वाचा फोडण्यासाठी ‘विद्यार्थी कृती समिती, नांदेड’ च्या वतीने येत्या २० मे २०२६ रोजी नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या संदर्भातील पुढील दिशा, भूमिका आणि प्रमुख मागण्या जाहीर करण्यासाठी १८ मे रोजी दुपारी २:०० वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, पालक, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात मानसिक तणावाचे वातावरण

विद्यार्थी कृती समितीच्या मते, NEET परीक्षा ही देशातील वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून तिच्यावर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे. मात्र, वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावली जात आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास धोक्यात आला असून अनेक विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. केवळ चौकशीच्या घोषणा न करता दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे, असे समितीने म्हटले आहे.

विद्यार्थी कृती समितीच्या ११ प्रमुख मागण्या

१. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची चौकशी: केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
२. NTA महासंचालकांवर कारवाई: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक मा. सुबोध कुमार सिंग यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
३. आत्महत्या प्रकरणांची दखल: NEET पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
४. NTA ची पुनर्रचना: राधाकृष्णन समितीच्या अहवालातील कलम ६.१ नुसार NTA ची व्यापक पुनर्रचना करण्यात यावी, जेणेकरून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व व तांत्रिक सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.
५. सखोल चौकशीसाठी SIT ची स्थापना: या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व सूत्रधार, दलाल, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर त्यांच्या पदाचा किंवा प्रभावाचा विचार न करता कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून निश्चित कालावधीत तपास पूर्ण करावा व अहवाल सार्वजनिक करावा.
६. कठोर कायदे लागू करणे: NEET पेपरफुटी हा देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर गुन्हा मानून दोषींवर UAPA किंवा तत्सम कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.
७. मानसिक आरोग्य व समुपदेशन सुविधा: मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर ‘मानसिक आरोग्य सहाय्य हेल्पलाइन’ सुरू करण्यात यावी. तसेच राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, समुपदेशन व भावनिक सहाय्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी.
८. आर्थिक मदत व नुकसानभरपाई: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी.
९. मोफत प्रवास सुविधा: परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना राज्य परिवहन (ST) बस व रेल्वेमार्फत मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
१०. कोचिंग संस्थांना निर्देश: प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कोचिंग संस्थांना RE-NEET परीक्षेपर्यंत मोफत क्रॅश कोर्स, अभ्यास सत्रे, शंका निरसन सत्रे व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात.
११. दोषी विद्यार्थ्यांना बंदी: या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना किमान तीन वर्षांसाठी NEET परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात यावी.

कोणत्याही राजकीय हेतूशिवाय लढा पाठिंब्याचे आवाहन

विद्यार्थी कृती समितीने स्पष्ट केले आहे की, हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून, केवळ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी उभारण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिक्षण पद्धतीत ठोस सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर समितीने सर्व विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून किनवट येथे जुगार अड्ड्यावर छापा

Next Post

गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post
गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई १ कोटी लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved