aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिस भाग्यनगर ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
April 24, 2026
in क्राईम
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २४ एप्रिल प्रतिनिधी

शहरात खळबळ माजवून देणाऱ्या भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य एका साथीदाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींना थेट उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

नेमकी घटना काय होती?

दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १:१० ते १:३० च्या सुमारास कॅनॉल रोडवरील ईस्केअरजवळ ही धक्कादायक घटना घडली होती. जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन प्रफुल उर्फ अर्जितसिंग गजानन चव्हाण यांची चाकू आणि तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मुख्य आरोपी फरार झाले होते, ज्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

वाराणसीत रचला सापळा

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी सोलापूर, पुणे आणि इतर जिल्ह्यांत पथके रवाना करण्यात आली होती. यादरम्यान, सपोनि सुनील भिसे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे लपले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने वाराणसीला पोहोचले. तेथे आरोपी आपले अस्तित्व लपवून आणि मोबाईल बंद करून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना घेरण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. साई उर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (वय २६ वर्ष, रा. सिडको, नांदेड) – मुख्य आरोपी.
२. नितेश परमेश्वर इंगळे (वय २२ वर्ष, रा. शिवनगर, महाराणा प्रताप चौक, नांदेड).
सोशल मीडियावर मुख्य आरोपीने सरेंडर केल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे पाठलाग करून त्यांना पकडले आहे.

तपास पथकाचे कौतुक

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि सुनील भिसे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल वाराणसी पोलीस अधीक्षकांनीही नांदेड पोलिसांचे अभिनंदन केले असून, नांदेड पोलीस अधीक्षकांमार्फत वाराणसी पोलिसांना प्रशंसापत्र पाठवण्यात येणार आहे.
आरोपींना पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक कोंबिंग ऑपरेशनमध्ये १३९ हून अधिक आरोपींवर मोठी कारवाई

Next Post

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved