aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
January 3, 2026
in क्राईम
0
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 3 जानेवारी 2026 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कडक पावले उचलली असून सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राइव्ह अंतर्गत शहर व परिसरात व्यापक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या निर्देशानुसार 1 व 2 जानेवारी 2026 रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या एकूण 13 इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्री व मद्यपान करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान दारूचे साहित्य विक्री करताना तीन इसम आढळून आले. त्यांच्यावर कलम 68 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

पोलीस स्टेशन वजिराबाद हद्दीत मल्लेप्पा हायस्कूल परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांततेचा भंग करणारा एक इसम मिळून आला. त्याच्यावर कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच वजिराबाद चौक येथे एक फटाका बुलेट मोटारसायकल आढळून आल्याने वाहनावर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत एमआयडीसी गोपाळचावडी परिसरात दारू पिऊन गोंधळ घालणारे तीन इसम आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली.

पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीत शिवमंदिर रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारा एक इसम सापडला. त्याच्यावरही कलम 110/117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील हॉटेल्स व वाईन शॉपची तपासणी करण्यात आली.

तसेच दामिनी पथकाने विसावा गार्डन व बर्की चौक परिसरात कारवाई करत दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या पाच इसमांवर शिवाजीनगर व इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गोंधळ घालणे किंवा शांततेचा भंग करणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नांदेड शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी

Next Post

पद्मशाली समाजाचा सन्मानाचा क्षण : विजयी नगरसेवकांचा युनायटेड पद्मशाली संगमकडून भव्य सत्कार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

पद्मशाली समाजाचा सन्मानाचा क्षण : विजयी नगरसेवकांचा युनायटेड पद्मशाली संगमकडून भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved