नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) दिनांक २९ ऑक्टोंबर
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील हिंगोली गेट ब्रिजजवळील KF Enterprises या फायनान्स कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे (वय ४० वर्षे, रा. माळकौठा, ता. मुदखेड, जि. नांदेड) यांचा मृतदेह आढळल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती. याप्रकरणी मृत शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २४/१०/२०२६ रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०३(१), १४०(१), १४०(२), १४२, १२७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना व धडक कारवाई
या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन (I.P.S.) यांनी या गुन्ह्याच्या सखोल व निष्पक्ष तपासासाठी मा. रामेश्वर वेंजने (उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग नांदेड शहर) यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकात ३ पोलीस अधिकारी व ६ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक, वजिराबाद पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील विशेष पथकांनी नांदेड व परभणी येथे धडक कारवाई करत गुन्हयातील मुख्य पाहिजे असलेले आरोपी अनुक्रमे –
- हरप्रीतसिंह उर्फ मंटू पि. नरेंद्रसिंह मेजर (वय ४० वर्षे, व्यवसाय – पतसंस्था चालक / फायनान्स चालक, रा. खुरसाळे हॉस्पिटल जवळ, अचूकनगर, नांदेड)
- सतपालसिंह पि. किशनसिंह खालसा (वय ४७ वर्षे, व्यवसाय – फायनान्स चालक / सचिव, कुबेरफल पतसंस्था, रा. भगतसिंह रोड, जुना मोंढा, नांदेड)
- शेख शोएब शेख मेहमुद (वय २१ वर्षे, व्यवसाय – खाजगी नौकरी / खालसा फायनान्स काम, रा. क्रांती नगर, जि. परभणी)
यांना ताब्यात घेतले असून त्यांना वजिराबाद पोलीस ठाण्यात (SIT) हजर करण्यात आले आहे व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी अटक केलेले आरोपी:
या प्रकरणात यापूर्वी पोलीस ठाणे वजिराबाद आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील विशेष पोलीस पथकांनी तातडीने कारवाई करत खालील आरोपींना अटक केली होती:
- जयकुमार उर्फ शेरा (भैया) भगवान गायकवाड (वय २२ वर्षे, रा. गोपाळचावाडी, सिडको, नांदेड) – दिनांक २६/१०/२०२६ रोजी अटक.
- शेख अमेेर शेख साहब हुसेन (वय २५ वर्षे, रा. खुदबे नगर चौरास्ता, देगलूर नाका, नांदेड) – दिनांक २६/१०/२०२६ रोजी अटक.
- इम्रान खान पि. शाहबाज खान (वय ४० वर्षे, रा. बुरानमस्जिद समोर, गोवर्धनघाट टेकडी, नांदेड) – दिनांक २६/१०/२०२६ रोजी अटक.
- शेख मुदस्शीर शेख खदीर (वय २४ वर्षे, रा. पाशा कॉलनी, अर्धापूर, नांदेड) – दिनांक २६/१०/२०२६ रोजी अटक.
- शेख अहमद उर्फ अस्लम मोहम्मद बशीर (वय ३८ वर्षे, व्यवसाय – के.एफ. फायनान्सचा भागीदार, रा. नंदीनगर, नांदेड) – दिनांक २६/१०/२०२६ रोजी अटक.
- सुमेध शेकोजीराव डोईबळे (वय २१ वर्षे, व्यवसाय – के.एफ. फायनान्स मॅनेजर, रा. तुप्पा ता. नांदेड) – दिनांक २७/१०/२०२६ रोजी अटक.
सदर सर्व आरोपी विविध मुदतीपर्यंत पोलीस कोठडी (P.C.R.) मध्ये आहेत.
पोलिसांची यशस्वी कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि/गोविंद खैरे, सपोनि/विठ्ठल घोगरे, सपोनि पौउपनि/साईनाथ पुयड व पथकातील अंमलदार; तसेच विशेष तपास पथकातील (SIT) सपोनि/विठ्ठल धुरपडे, सपोनि/बालीजी महाजन, पोउपनि/रमेश गायकवाड व पथकातील अंमलदार आणि वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोनि/अजित कुंभार, पोउपनि/सुनील बुलंगे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी पार पाडली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कर्जवसुली किंवा फायनान्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर त्रास, धमकी किंवा दबाव येत असल्यास शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी घाबरून किंवा भावनेच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. अशा प्रकारचा त्रास होत असल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर कळवावे. तक्रार मिळाल्यानंतर संबंधित दोषीविरुद्ध कायदेशीरनुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल












