नांदेड १७ एप्रिल (प्रतिनिधी माधव)
नांदेड शहरातील वाढत्या चोऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवण्यात आले. या धडक मोहिमेत गेल्या ८ दिवसांत तब्बल ११९ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मध्यरात्री दोन तास शहराची नाकाबंदी
दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री ११:०० वाजेपासून ते १७ एप्रिल रोजी पहाटे ३:०० वाजेपर्यंत शहर आणि परिसरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार अशा एकूण २७ अधिकारी आणि १०६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने शहराचा कोपरा न कोपरा पिंजून काढला.
कारवाईचा तपशील (आकडेवारी):
या ऑपरेशन दरम्यान मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे आणि तडीपार आरोपींची तपासणी करण्यात आली. त्याचे आकडे खालीलप्रमाणे आहेत: तपशील संख्या तडीपार गुन्हेगारांची तपासणी (कलम ५५, ५६) ६६ सराईत गुन्हेगारांची तपासणी (MPDA अंतर्गत) २५ बाँडचा भंग केलेले गुन्हेगार (Breach of Bond) १२ आर्म ॲक्ट अंतर्गत कारवाई ०२ कलम १२२, १२४ मपोका अन्वये गुन्हे ०४
तडीपारांना शोधून काढले
विशेष म्हणजे, ६ एप्रिल ते १३ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी झालेल्या नाकाबंदीत कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार तडीपार करण्यात आलेले ०८ आरोपी शहरातच फिरताना आढळून आले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण मोहिमेत सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाली कारवाई
या मोहिमेत शहर विभाग, इतवारा, कंधार, बिलोली, देगलूर, माहूर यासह कुंटूर, रामतीर्थ, सोनखेड, उस्माननगर आणि लिंबगाव येथील पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
गुन्हेगारांचे ‘राऊंडिंग अप’ (धरपकड) आणि सातत्यपूर्ण तपासणीमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.












