aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दिल्ली पोलिसांना मोठा हातभार पंजाबमधील फरार आरोपी नांदेडेत गजाआड

Aawaz Times by Aawaz Times
March 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी: माधव वाघमारे

नांदेड, दि. 1 मार्च: दिल्ली आणि पंजाबमध्ये खून, फायरिंग, धमकी देणे यासारख्या गंभीर स्वरूपाच्या सहा गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीस नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई स्पेशल सेल दिल्लीच्या पोलिसांना सहाय्य करताना करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, स्पेशल सेल दिल्लीच्या पथकाला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गोपनीय माहितीच्या आधारे, फरार आरोपी नांदेड शहरात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीास ताब्यात घेतले. आरोपीने आपले नाव अर्जदीपसिंग उर्फ जसविंदरसिंग (वय 27, रा. धर्मा, जि. होशियारपूर, पंजाब) असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने दिल्ली व पंजाबमध्ये खून, फायरिंगसह इतर गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली. दिल्लीच्या स्पेशल सेल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा क्रमांक 304/2025 भा.न्याय संहिता कलम 61(2) आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम 25, 25(8) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

आरोपी अर्जदीपसिंगला पुढील कारवाईसाठी स्पेशल सेल दिल्लीच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि रवी वाहुळे, पोउपनि महेश कोरे, तसेच पथकातील पोलीस अंमलदार बळीराम दासरे, माधव केडे, गुंडेराव करळे, सिष्टु सोनसळे, राजदीपसिंग, मोतीराम पवार, श्रीराम दासरे आणि संग्राम गायकवाड यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

रेल्वे अधिकारी क्लब मध्ये २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

आरपीएफ नांदेडची प्रवासी सुरक्षेसाठी मोठी कारवाई नन्हे फरिश्ते व यात्री सुरक्षा अंतर्गत यश

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

आरपीएफ नांदेडची प्रवासी सुरक्षेसाठी मोठी कारवाई नन्हे फरिश्ते व यात्री सुरक्षा अंतर्गत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved