aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आरोग्य

आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा

Aawaz Times by Aawaz Times
November 4, 2026
in आरोग्य
0
आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. ०४ (प्रतिनिधी माधव वाघमारे): सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिले आहेत. आरोग्य सेवेत कसूर, अनियमितता किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा त्यांनी नांदेड येथील आढावा बैठकीत दिला.

आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या १ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘आरोग्य संवाद यात्रा’ दौऱ्यात दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने, ३ नोव्हेंबर रोजी डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या यात्रेदरम्यान काही ठिकाणी कामकाजात त्रुटी व अनियमितता निदर्शनास आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत डॉ. कंदेवाड यांनी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आणि आवश्यकतेनुसार बदलीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यमापन करण्यावर भर दिला.

बैठकीतील प्रमुख निर्देश व महत्त्वाचे मुद्दे:

  • अत्यावश्यक सेवा व औषधसाठा: जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये २४ तास अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध ठेवाव्यात. रुग्णांना बाहेरील औषधे लिहून देऊ नयेत. जीवनावश्यक व जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा, १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा, प्रयोगशाळा तपासण्या आणि एक्स-रे सुविधा नियमितपणे उपलब्ध ठेवाव्यात.
  • स्वच्छता व सुविधा: वैद्यकीय उपकरणे नेहमी कार्यान्वित ठेवून त्यांची नियमित देखभाल करावी. रुग्णालयातील स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, रुग्णांना मिळणारा आहार आणि कंत्राटी सेवांचा दर्जा उत्तम ठेवावा. रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी सर्व कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेने वागावे.
  • बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक: सर्व नियमित व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पोर्टलवरील नोंदणी ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. फेस रीडिंग व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असून, त्यानुसारच वेतन अदा केले जाईल. यात अनियमितता आढळल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित होईल.
  • मुख्यालयी निवास: सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहूनच नियमितपणे रुग्णसेवा द्यावी.
  • शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी: महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र रुग्णांची नोंदणी वाढवावी. रुग्णकल्याण समितीचा निधी पारदर्शक पद्धतीने वापरावा. जन्म नोंदणी २१ दिवसांच्या आत पूर्ण करून प्रमाणपत्र वितरित करावे.
  • अधिकारी भेटींचे नियोजन: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी महिन्यात किमान ५ आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना नियमित भेटी द्याव्यात.

नागरिकांना दर्जेदार, तत्पर, पारदर्शक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असून, यात कसूर करणाऱ्यांवर पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांसह कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा डॉ. कंदेवाड यांनी बैठकीचा शेवटी दिला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

Next Post

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ
आरोग्य

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ

June 28, 2026
नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य

नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न

May 6, 2026
आरोग्य

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून केले एलतडीपार

March 29, 2026
आरोग्य

Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पाहणी

December 18, 2025
आरोग्य

पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन

October 5, 2025
आरोग्य

शिबिरात ८५ महिलांची आरोग्य तपासणी

September 22, 2025
Next Post
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved