aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत कडक मोहीम

Aawaz Times by Aawaz Times
December 13, 2025
in क्राईम
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | दि. 13 डिसेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार 12 डिसेंबर 2025 रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई पार पडली. संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाई केली.

भाय्यनगर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई
स्नेहनगर, जंगमवाडी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान 5 इसम दारूच्या नशेत आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच जंगमवाडी रोड येथे एका वाहनास नंबर नसल्याने वाहनावर 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पूर्णा रोड परिसरात दारू विक्री करताना आढळलेल्या एका इसमावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कारवाई
एम.आय.डी.सी., ढवळे चौक व स्वामी वाईन शॉप परिसरात पेट्रोलिंग करताना 6 इसम दारूच्या नशेत सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळले. त्यांच्यावर कलम 110/117 अन्वये कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणीही करण्यात आली.

इतवारा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई
जुना मोंढा परिसरात 1 इसम दारूच्या नशेत गोंधळ घालताना आढळून आला. त्याच्यावरही कलम 110/117 अन्वये कारवाई करण्यात आली. सोबतच हद्दीतील दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत कारवाई
शिवनेरी, हातोडा चौक परिसरात 9 इसम दारूच्या नशेत आरडाओरड व गोंधळ करताना आढळले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या भागातही दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची सखोल तपासणी करण्यात आली.

दामिनी पथकाची कारवाई
विश्रांत गार्डन परिसरात दामिनी पथकाने पेट्रोलिंगदरम्यान 6 इसम दारूच्या नशेत आढळून आले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 110/117 अन्वये कारवाई करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला की, नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात शिस्त व सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सावधान पतंगबाजीचा आनंद जीवघेणा ठरू शकतो नायलॉन मांज्यावर नांदेड पोलिसांचा कडक इशारा

Next Post

तरुणाचे अकस्मात निधन परिसरात शोककळा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

तरुणाचे अकस्मात निधन परिसरात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved