aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा प्रहार

Aawaz Times by Aawaz Times
April 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १ एप्रिल प्रतिनिधी
राज्यात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने कंबर कसली आहे. पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करून ५ लाख ३ हजार ७४० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
नांदेड परिक्षेत्रात गुटखा निर्मूलनासाठी १६ मार्च २०२६ पासून विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत, ३१ मार्च रोजी विशेष पथकाला माहिती मिळाली की, इतवारा भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून ठेवला आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पथकाने इस्लामपुरा भागातील शर्मा यांच्या मळ्यातील शेडवर छापा टाकला. या कारवाईत ५,०३,७४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांच्या हाती लागला.
या आरोपींविरुद्ध झाली कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना निष्पन्न केले असून त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर (रा. मदिना नगर, देगलूर नाका, नांदेड)
२) शेख अमीर (रा. हिमायतनगर, नांदेड)
३) शेख अजिम परभणीवाला (रा. परभणी)
४) बबलू शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद (रा. मदिना नगर, मुदखेड)
शेजारील राज्यातून पुरवठा; रॅकेटचे जाळे मोठे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मोहम्मद शोएब याच्याकडे हा माल मिळून आला. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हे चारही आरोपी संघटितपणे गुटखा व्यवसायात कार्यरत आहेत. ते शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा खरेदी करून नांदेड व परभणी जिल्ह्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना त्याचा पुरवठा करत होते. या साखळीत आणखी अनेक लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील तपास सुरू
पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास इतवारा पोलीस ठाण्याचे पोउपनि आगलावे हे करत आहेत. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही तपासणी केली जात असून, या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
वृत्त संकलन
प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Next Post

२११ वाहनांवर खटले भरून २ लाख ३१ हजार चा दंड वसूल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

२११ वाहनांवर खटले भरून २ लाख ३१ हजार चा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved