aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापे १७ आरोपींवर ५ गुन्हे दाखल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
July 2, 2026
in क्राईम
0
अवैध गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापे १७ आरोपींवर ५ गुन्हे दाखल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २ जुलै प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (३० जून) विशेष मोहीम राबवून अवैध गुटखा विक्री आणि जुगार खेळणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १७ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १,९७,१८५/- रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ठाकुर पान शॉपवर छापा; प्रतिबंधित गुटखा जप्त

३० जून २०२३ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अहिल्याबाई चौक भागातील आगम हॉटेलशेजारी असलेल्या ‘ठाकुर पान शॉप’वर पोलिसांनी छापा टाकला. या तपासणीत दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याच्या पुड्या मिळून आल्या.
याप्रकरणी दुकानाचा मालक आरोपी विक्रमसिंह बद्रीसिंह ठाकुर (वय ३६ वर्षे, रा. नरोबा मंदिरजवळ, कौठा, नांदेड) याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८०३/२०२६, कलम ५, ७ सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चार वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी; १६ जण ताब्यात

दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी हद्दीतील चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या ‘तिरट’ नावाच्या जुगारावर छापे टाकले. सिडकोकडे जाणारा रोड, लातूर फाटा जवळील मोकळी जागा, जुना कौठा रोडचा बाजूला आणि उस्माननगर रोडच्या बाजूला हे जुगार अड्डे सुरू होते. या धाडीत एकूण १६ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) गौतम हिरामन वाठोरे (वय ४३, रा. हडको, नांदेड)
२) राजीव बसवंते (रा. रूंज, ता. वसमत, जि. हिंगोली)
३) प्रभाकर सदाशिव मारतळे (वय ४७, रा. बळीरामपूर, नांदेड)
४) एकनाथ व्यंकटराव रायपतवार (वय ५२, रा. सिडको, नांदेड)
५) संभाजी सिकंदर भोकरे (वय ३३)
६) राहुल हरी गायकवाड (वय ४३)
७) रवी नरहरी जाधव (वय ४५)
८) वामन हरी गायकवाड
९) गजानन भगवान सुर्यवंशी (सर्व रा. जुना कौठा, नांदेड)
१०) राजेश उमाजी गोडबोले (वय ३१)
११) हिराचंद भानुदास भोकरे (वय ३५)
१२) किरण भोकरे
१३) सुनिल भोकरे (सर्व रा. जुना कौठा, नांदेड) आणि इतर तिघे.
या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार ४ गुन्हे आणि तंबाखू प्रतिबंधक कायद्यानुसार १ गुन्हा, असे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) सुरज गुरव, आणि उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि बाबूराव चव्हाण, पोउपनि व्यंकट कुसमे, तसेच पोलीस अंमलदार कानगुले, भिसे, शेख गफार, तेलंग, टिप रसे, हनमंत तेलंग, जमीर आणि सिरमलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस प्रशासनाचा इशारा:
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, वाहतूक, अवैध दारू, जुगार आणि गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर मोहीम राबवली जाईल. अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

– विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड महानगरपालिकेत राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा मनपातील डॉक्टरांचा विशेष सन्मान

Next Post

गुजरात पासिंगच्या कारमधून चालली होती तस्करी; एलसीबीने साईबाबा मंदिर परिसरात रचला सापळा दोघे गजाआड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post
गुजरात पासिंगच्या कारमधून चालली होती तस्करी; एलसीबीने साईबाबा मंदिर परिसरात रचला सापळा दोघे गजाआड

गुजरात पासिंगच्या कारमधून चालली होती तस्करी; एलसीबीने साईबाबा मंदिर परिसरात रचला सापळा दोघे गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved