प्रतिनिधी: माधव वाघमारे दिनांक ३० ऑक्टोंबर
नांदेड दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास नांदेड शहरातील देगावचाळ परिसरात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वजिराबाद पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. यातील दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री मयत सिद्धार्थ उर्फ धीरज वैजनाथ थोरात हा आपल्या मित्रासोबत देнгаंवचाळ येथून चहा पिण्यासाठी पाय जात होता. सोमेश कॉलनी येथील रोडवर पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या विशाल पंडित, विश्वजीत धबाले आणि रोहित खाडे यांनी त्यांना दुचाकीने कट मारला. याचा जा विचारल्यावरून आरोपींनी शिवीगाळ करत त्यांच्या हातातील खंजिराने वार करून सिद्धार्थला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या सिद्धार्थला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचा भाऊ सूरज थोरात यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(1), ११८(1), १८९(2), १९०, १९१(2), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची धडक कारवाई व तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वजिराबादचे प्रभारी अधिकारी अजित कुंभार यांना दिले होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन पथके स्थापन केली होती.
वजिराबाद पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि वेगाने शोधमोहीम राबवून खालील आरोपींना ताब्यात घेतले:
- विशाल राजू पंडित (वय २१ वर्षे, रा. भैय्यासाहेब आंबेडकरनगर, देगावचाळ, नांदेड)
- पवन रावसाहेब नरवाडे (वय २१ वर्षे, रा. भैय्यासाहेब आंबेडकरनगर, देगावचाळ, नांदेड)
- एक विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी प्रेम पंडित आवटे (वय १९ वर्षे, रा. देнгаंवचाळ, नांदेड) यास देखील वजिराबाद पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अटक केली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
न्यायालयीन कोठडी
अटक केलेल्या आरोपींपैकी दोघांना गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि इतर बाबींच्या सखोल तपासासाठी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रामेश्वर व व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोनि/अजित कुंभार, सपोनि/प्रशांत लोंढे, पोउपनि/सुनील बुलंगे, पोउपनि/खंडू दर्शन व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.












