aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

Aawaz Times by Aawaz Times
August 5, 2026
in आपलं नांदेड
0
आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ५ ऑगस्ट ( प्रतिनिधी): आदिवासीबहुल किनवट तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विकास योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. पेसा अंतर्गत उपलब्ध निधी वेळेत, पारदर्शकपणे आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांसाठी खर्च करून आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करत निश्चित कालमर्यादेत ग्रामविकासाची उद्दिष्टे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. पाटील यांनी आदिवासीबहुल किनवट तालुक्याचा पहिलाच दौरा केला. पंचायत समिती, किनवट येथे झालेल्या तब्बल दोन तासांच्या मॅरेथॉन आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत विकासकामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गीरी, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, व्हीबी-जी-रामजी, कर वसुली, पेसा, शाळा व अंगणवाडी तसेच ग्रामपंचायतींच्या विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

शाळा, अंगणवाड्यांना प्राधान्य व दप्तरदिरंगाईवर इशारा शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच १५ व १६ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळा व अंगणवाडीत विद्युत व सौरऊर्जासाठी आवश्यक तरतूद करण्याचे निर्देश सीईओ पाटील यांनी दिले. पेसा अंतर्गत मंजूर निधी वेळेत खर्च करून विकासकामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

कचरा व्यवस्थापन व इतर योजनांचा आढावा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ ची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देताना प्रत्येक ग्रामपंचायतीत कचऱ्याचे चार प्रकारांत संकलन, विलगीकरण आणि व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. घरकुलांची उद्दिष्टपूर्ती, व्हीबी-जी-रामजी योजनेची कामे, कर वसुली व स्वच्छ भारत अभियानाच्या प्रगतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश देत आदिवासी भागातील नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. जी. जामुदे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार महामुने, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, जीवन कांबळे, निवृत्ती मुकनर, अमोल टोम्पे, अल्केश शिरसेटवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

घरकुलांची पाहणी; ग्रामस्थांशी थेट संवाद, हिमायतनगर पंचायत समितीलाही भेट आढावा बैठकीनंतर सीईओ महेश पाटील यांनी बोधडी (बु.) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित वसतिगृहाच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर जलधारा येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी असमाधान व्यक्त करत तातडीने गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश दिले. याच दौऱ्यात त्यांनी पंचायत समिती, हिमायतनगर येथेही भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

वेळेत हजर राहा; विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी यावेळी दिला.

प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

Next Post

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post
मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

मास रेड मोहिमेत ६१ गुन्हे दाखल ७३ आरोपींवर कारवाई तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved