aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, November 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, November 8, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नंदीनगर येथील तरुणाच्या खून प्रकरणातील १२ आरोपांना अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
October 29, 2026
in क्राईम
0
नंदीनगर येथील तरुणाच्या खून प्रकरणातील १२ आरोपांना अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

  प्रतिनिधी, माधव वाघमारे दिनांक २९ ऑक्टोंबर

मुदखेड: दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी नंदीनगर, मुदखेड येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून भीमराव नकलवाड आणि शेषराव उर्फ केशव नकलवाड या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या अर्जुनावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत तब्बल १२ जणांना अटक केली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील:

दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी नंदीनगर येथे दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गल्लीतील इतर लोकांसह अर्जुन उर्फ अजय शिवाजी नकलवाड (वय २० वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) हा तरुण मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी दंगा करणाऱ्या आरोपींनी अर्जुनच्या छातीवर दगड व विटांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मुदखेड येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मरण पावल्याचे घोषित केले.

या प्रकरणी मयताची आई सौ. लक्ष्मीबाई शिवाजी नकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांची धडक कारवाई:

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाहम रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक / गणेश कराड व त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने तपासाचक्रे फिरवली. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीतून शोधमोहिम राबवून अवघ्या काही तासांच्या आत एकूण १२ आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१. भीमराव चिमणा नकलवाड (वय ६५ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) २. सुभाश भीमराव नकलवाड (वय २४ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) ३. रमेश भीमराव नकलवाड (वय २७ वर्षे, रा. वसमत, ह.मु. नंदीनगर, मुदखेड) ४. राहुल भीमराव नकलवाड (वय २२ वर्षे, रा. चुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी, ह.मु. नंदीनगर, मुदखेड) ५. बाबुशा भीमराव नकलवाड (वय ३५ वर्षे, रा. वसमत, जि. हिंगोली, ह.मु. नंदीनगर, मुदखेड) ६. शेषराव उर्फ केशव गोविंद नकलवाड (वय ६० वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) ७. संभाजी शेषराव उर्फ केशव नकलवाड (वय २७ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) ८. मारोती शेषराव उर्फ केशव नकलवाड (वय २५ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) ९. अर्जुन उर्फ राजेश शेषराव उर्फ केशव नकलवाड (वय २० वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) १०. अर्जुन उर्फ राजेश शेषराव उर्फ केशव नकलवाड (वय २० वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) ११. रवि उर्फ मुन्ना नकलवाड (वय २१ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड) १२. सुनिल भीमराव नकलवाड (वय २५ वर्षे, रा. नंदीनगर, मुदखेड)

गुन्ह्यातील सहभागाची खात्री पटल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश कराड, सपोनि/कल्पना राठोड, पोउपनि/सुरेश जाधव, पोउपनि/राजेश नंद, पोउपनि/आकाश सरोदे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पालकांनो सावध व्हा मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संगती अन् वर्तनाकडे द्या लक्ष

Next Post

नांदेड मध्ये मंदिरात चोऱ्या करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
नांदेड मध्ये मंदिरात चोऱ्या करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

नांदेड मध्ये मंदिरात चोऱ्या करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved