aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी

Aawaz Times by Aawaz Times
December 30, 2025
in राजकारण
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड ३० डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच वंचित, रासपा यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी दिली. मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय होईल व काँग्रेसची उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज नांदेड येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा नांदेडचे निरीक्षक माणिकराव ठाकरे दाखल झाले होते. काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती; मात्र बैठका सुरू असल्याने माणिकराव ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्याऐवजी खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, माणिकराव ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, रासपा व इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. निवडणुकीत सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, हा काँग्रेसचा प्रमुख उद्देश आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर सखोल चर्चा सुरू असून काँग्रेसकडे ८१ जागांवर सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत, असे खा. चव्हाण यांनी सांगितले. एमआयएममध्ये प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्येही काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. एमआयएममध्ये गेलेले माजी नगरसेवक हे मनाने काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्या संपर्कात होते, असा दावा त्यांनी केला.

तसेच अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी मध्यरात्री काही पदाधिकाऱ्यांच्या भेटी झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा उल्लेख करत, “तो व्हिडिओ आणखी काही वेळ शूट झाला असता तर आणखी काही चेहरे समोर आले असते,” असा आरोप खा. चव्हाण यांनी केला. भाजपमध्ये गेलेले काही नगरसेवक तसेच माजी महापौर सध्या काँग्रेसच्या संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी केला.

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल, असे स्पष्ट करताना खा. चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत कोणतीही युती करण्याचा प्रश्न नसल्याचे ठामपणे सांगितले.

या वेळी खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, प्रा. यशपाल भिंगे, डॉ. दिनेश निखाते, अब्दुल हाफिज, बालाजी चव्हाण, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. रेखा चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

Next Post

गैरप्रकारांना झिरो टॉलरन्स दहावी बारावी परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

गैरप्रकारांना झिरो टॉलरन्स दहावी बारावी परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved