प्रतिनिधी – माधव वाघमारे
परभणी, ता. १० मार्च : आदर्श लोक कलावंत म्हणून ओळख असलेले शेख अफसर शेख सालार सहाव यांचा ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य (नोंदणी क्रमांक: एफ-००२०१३२) या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
संस्थेचे संस्थापक श्री. अशोक श्रीपती गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडणार असून याप्रसंगी मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी, कलावंत, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय अतिथींच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
शेख अफसर यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आणि कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांचा या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शेख अफसर यांनी आपल्या कार्यातून समाजात नाविन्यपूर्ण ठसा उमटवला असून युवा पिढीसाठी ते प्रेरणास्थान आहेत.
शेख अफसर यांच्या या उपलब्धीबद्दल त्यांच्यावर परभणीतील कला व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सोहळ्याचे ठिकाण व तारीख याबाबत अद्याप अधिक माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.












