aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई खंडणी आणि जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
May 15, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई खंडणी आणि जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १५ मे (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
नांदेड शहरात दहशत निर्माण करून खंडणी मागणाऱ्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील हे दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते.

नेमकी घटना काय?

दिनांक ८ मे २०२६ रोजी फिर्यादी आदित्य देवानंद मड्रेवार (रा. भविष्य नगर, नांदेड) यांना आरोपी ऋषी सोनकांबळे, साई आणि त्यांच्या इतर साथीदारांनी अडवले होते. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले होते.
इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या हातातील चांदीच्या दोन अंगठ्या, कानातील बाली आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण २२,००० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच, “पैसे न दिल्यास जीवे मारून टाकू,” अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक

सदर गुन्ह्यातील गांभीर्य ओळखून नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या सूचनांनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती गोळा केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१) साईनाथ बालाजी परकेवाड (वय १९ वर्षे, रा. सिडको, नांदेड) – याला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
२) सचिन रमेश जिंकलवाड (वय २० वर्षे, रा. असदवन, नांदेड) – याला चुंगी नाका ब्रिज खालून ताब्यात घेण्यात आले.

पोलीस पथकाचे कौतुक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिलनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोविंद राठोड, साहेबराव कदम, विठ्ठल वैद्य, अकबर पठाण तसेच सायबर सेलचे राजू सिटीकर, दिपक ओढणे, महेश बडगु आणि रेश्मा पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे नांदेड पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महिला सशक्तिकरण की ओर गोवा की बड़ी छलांग मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने किया महिला उद्यमिता मंच का उद्घाटन

Next Post

शेतकरी आणि सामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवा महापौर कविता मुळे

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
शेतकरी आणि सामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवा महापौर कविता मुळे

शेतकरी आणि सामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवा महापौर कविता मुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved