aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १४ अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार

Aawaz Times by Aawaz Times
May 30, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड पोलीस दलातील १४ अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ३० मे

(प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवणारे १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस उपनिरीक्षक, ३ ग्रेड उपनिरीक्षक, ५ पोलीस अंमलदार व १ वरिष्ठ श्रेणी लिपिक असे एकूण १४ अधिकारी व अंमलदार आज दि. ३० मे २०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘मंथन हॉल’ येथे आयोजित एका विशेष समारंभात सर्व सेवानिवृत्तांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड शहर) मा. श्री. सुरज गुरव आणि पोलीस उप-अधीक्षक (कंधार) श्रीमती डॉ. अश्विनी जगताप यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

‘कुटुंबाला वेळ द्या अन् आरोग्याची काळजी घ्या’ – पोलीस अधीक्षकांचा सल्ला

यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवेचे कौतुक केले. आयुष्यातील प्रदीर्घ काळ पोलीस दलासारख्या अत्यंत व्यस्त आणि तणावाच्या क्षेत्रात दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच, “इथून पुढचा काळ हा आपल्या कुटुंबासाठी असून, सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची उत्तम काळजी घ्यावी आणि सुखी, आनंदी जीवन जगावे,” असा मोलाचा सल्ला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.

या अधिकाऱ्यांचा व अंमलदारांचा झाला सत्कार:

सेवानिवृत्त झालेल्या १४ जणांची नावे आणि त्यांची शेवटची नेमणूक खालीलप्रमाणे आहे: अ.क्र. पद / हुद्दा सेवानिवृत्त अधिकारी/अंमलदाराचे नाव शेवटची नेमणूक १ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहेबराव लक्ष्मण गुट्टे पोलीस उप-अधीक्षक (मु.) २ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. बाबा नागोराव गजभारे पोलीस नियंत्रण कक्ष ३ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. प्रल्हाद संभाजी हैबतकर जि.वि.शा. नांदेड ४ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. बाबु मैसाजी शिंदे विमानतळ सुरक्षा पथक, नांदेड ५ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. सुदाम आमरू आडे पोस्टे बारड ६ ग्रेड पोउपनि श्री. हनुमान कानोजी मेश्राम पोस्टे मांडवी ७ ⁠ग्रेड पोउपनि श्री. परमेश्वर जळबा कदम पोस्टे नांदेड ग्रामीण ८ ग्रेड चापोउपनि श्री. जगदिश मल्हारराव कुलकर्णी जि.वि.शा. नांदेड ९ सपोउपनि श्री. देविदास सोनबाजी बसवंते पो. मु. नांदेड १० सपोउपनि श्री. रानबा मारोतराव फड पोस्टे सोनखेड ११ पोहेकॉ श्री. कैलास किशनराव झाडते पोस्टे भोकर १२ पोहेकॉ श्री. दर्शन शिशुपाल यादव पो.मु. नांदेड १३ पोकॉ श्री. तानाजी माधवराव बिराजदार पोस्टे देगलूर १४ वरिष्ठ श्रेणी लिपिक (वश्रेली) श्री. आनंदा देवराव बैनवाड पो.अ. कार्यालय, नांदेड

समारंभाचे नेटके आयोजन

या सेवानिवृत्ती सोहळ्याला पोलीस कल्याण विभागाचे पोनि श्री. जगदीश मंडलवार यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे (AHTU) अच्युत मोरे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीआरओ कार्यालयाचे पोहेकॉ/१७५२ हनुमंत पोतदार, पोकॉ/मारोती कांबळे, नरेंद्र राठोड आणि पोलीस कल्याण विभागाच्या मपोकों/सविता भिंमलवाड यांनी परिश्रम घेतले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का राज्यभर में हुआ गर्मजोशी से स्वागत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Next Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये १ लाख २९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post
नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये १ लाख २९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये १ लाख २९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved