नांदेड ३० मे
(प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवणारे १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस उपनिरीक्षक, ३ ग्रेड उपनिरीक्षक, ५ पोलीस अंमलदार व १ वरिष्ठ श्रेणी लिपिक असे एकूण १४ अधिकारी व अंमलदार आज दि. ३० मे २०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘मंथन हॉल’ येथे आयोजित एका विशेष समारंभात सर्व सेवानिवृत्तांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड शहर) मा. श्री. सुरज गुरव आणि पोलीस उप-अधीक्षक (कंधार) श्रीमती डॉ. अश्विनी जगताप यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
‘कुटुंबाला वेळ द्या अन् आरोग्याची काळजी घ्या’ – पोलीस अधीक्षकांचा सल्ला
यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवेचे कौतुक केले. आयुष्यातील प्रदीर्घ काळ पोलीस दलासारख्या अत्यंत व्यस्त आणि तणावाच्या क्षेत्रात दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच, “इथून पुढचा काळ हा आपल्या कुटुंबासाठी असून, सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची उत्तम काळजी घ्यावी आणि सुखी, आनंदी जीवन जगावे,” असा मोलाचा सल्ला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.
या अधिकाऱ्यांचा व अंमलदारांचा झाला सत्कार:
सेवानिवृत्त झालेल्या १४ जणांची नावे आणि त्यांची शेवटची नेमणूक खालीलप्रमाणे आहे: अ.क्र. पद / हुद्दा सेवानिवृत्त अधिकारी/अंमलदाराचे नाव शेवटची नेमणूक १ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहेबराव लक्ष्मण गुट्टे पोलीस उप-अधीक्षक (मु.) २ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. बाबा नागोराव गजभारे पोलीस नियंत्रण कक्ष ३ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. प्रल्हाद संभाजी हैबतकर जि.वि.शा. नांदेड ४ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. बाबु मैसाजी शिंदे विमानतळ सुरक्षा पथक, नांदेड ५ पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) श्री. सुदाम आमरू आडे पोस्टे बारड ६ ग्रेड पोउपनि श्री. हनुमान कानोजी मेश्राम पोस्टे मांडवी ७ ग्रेड पोउपनि श्री. परमेश्वर जळबा कदम पोस्टे नांदेड ग्रामीण ८ ग्रेड चापोउपनि श्री. जगदिश मल्हारराव कुलकर्णी जि.वि.शा. नांदेड ९ सपोउपनि श्री. देविदास सोनबाजी बसवंते पो. मु. नांदेड १० सपोउपनि श्री. रानबा मारोतराव फड पोस्टे सोनखेड ११ पोहेकॉ श्री. कैलास किशनराव झाडते पोस्टे भोकर १२ पोहेकॉ श्री. दर्शन शिशुपाल यादव पो.मु. नांदेड १३ पोकॉ श्री. तानाजी माधवराव बिराजदार पोस्टे देगलूर १४ वरिष्ठ श्रेणी लिपिक (वश्रेली) श्री. आनंदा देवराव बैनवाड पो.अ. कार्यालय, नांदेड
समारंभाचे नेटके आयोजन
या सेवानिवृत्ती सोहळ्याला पोलीस कल्याण विभागाचे पोनि श्री. जगदीश मंडलवार यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे (AHTU) अच्युत मोरे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीआरओ कार्यालयाचे पोहेकॉ/१७५२ हनुमंत पोतदार, पोकॉ/मारोती कांबळे, नरेंद्र राठोड आणि पोलीस कल्याण विभागाच्या मपोकों/सविता भिंमलवाड यांनी परिश्रम घेतले.












