aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हैद्राबादमधून अटक नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
July 16, 2026
in क्राईम
0
९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हैद्राबादमधून अटक नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १६ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील फरार आणि वॉरंटमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे कडक निर्देश पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांनी दिले आहेत. या सूचनेचे तंतोतंत पालन करत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यातील आणि तब्बल ९ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका अट्टल आरोपीला तेलंगणातील हैद्राबाद येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?

बारड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात (गु.र.नं. १३४/२०१७ कलम ३७६(२)(J)(N) भादंविसह कलम ३(A), ४, ५(J), ६ पोक्सो ॲक्ट) आरोपी दौलतखान आन्वरखान पठाण (वय ३९ वर्षे, व्यवसाय- ऑटोचालक, रा. नागेली, ता. मुदखेड, जि. नांदेड) हा गेल्या ९ वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयातून स्टँडिंग वॉरंट / NBW वॉरंट जारी करण्यात आले होते.

गुन्हे शाखेने रचले जाळे

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोउपनि/ नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाला विशेष आदेश दिले होते. दरम्यान, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी पथकाला गोपनीय आणि खात्रीशीर बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर आरोपी हैद्राबाद येथे लपून बसला आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या परवानगीने पथकाने तात्काळ हैद्राबाद गाठले. तेथे शोध मोहीम राबवून बल्लागुडा, चंद्रानगुट्टा, हैद्राबाद (तेलंगणा) येथून आरोपी दौलतखान आन्वरखान पठाण याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला बारड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या पथकाने बजावली कामगिरी

ही धडाकेबाज कामगिरी मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) आणि श्री. अतुल भोसले (पोलीस निरीक्षक, स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली:

  • पोलीस उपनिरीक्षक: श्री. नागनाथ तुकडे
  • सहायक पोलीस उपनिरीक्षक: दारासिंग राठोड
  • पोलीस अंमलदार: मोहन हाक्के, सुनिल गटनेवार, महेश बडगू (स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड)
  • सायबर सेलचे पोलीस अंमलदार: राजू सिटीकर, दिपक ओढणे
    या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली असून, नांदेड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ग्रामसेवक संवर्गाची बदनामी करणाऱ्या रविराज साबळेविरुद्ध गुन्हा नोंदवा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे नांदेड पंचायत समिती बीडीओ यांना निवेदन

Next Post

एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved