aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवघ्या काही दिवसांत दुकानफोडीचा गुन्हा उघड ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
May 21, 2026
in क्राईम
0
अवघ्या काही दिवसांत दुकानफोडीचा गुन्हा उघड ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २१ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चोरी, घरफोडी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लश’ राबवले जात आहे. या अंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या काही दिवसांतच एका दुकानावरील दरोड्याचा छडा लावला आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण ३,०१,७००/- रुपयांचा चोरीला गेलेला इलेक्ट्रिक मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मालेगाव रोडवरील ‘कृष्णा ट्रेडर्स’मध्ये झाली होती चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव रोडवरील ‘कृष्णा ट्रेडर्स’ या इलेक्ट्रिकच्या दुकानात दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ५.३० ते ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचे इलेक्ट्रिकचे सामान चोरून नेले होते. याप्रकरणी तक्रारदाराने १९ मे २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरनं २७१/२६, कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गुपिबा खबऱ्याकडून मिळाली माहिती, मुदखेडचे आरोपी ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पो.उप.नि. विनोद देशमुख आणि त्यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, एका गोपनीय माहितीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, गुन्हा घडला त्या दिवशी (१५ मे) सकाळी कृष्णा ट्रेडर्सच्या आजूबाजूला काही संशयास्पद महिला, मुले आणि एक पुरुष फिरत होते. तसेच हे सर्वजण भंगार वेचणारे असून मुदखेड भागातील असण्याची शक्यता आहे.
या माहितीच्या आधारे पो.उप.नि. विनोद देशमुख व त्यांच्या टीमने तात्काळ मुदखेड गाठले. तेथे चौकशी दरम्यान गणेश साहेबराव नक्कलवाड हा व्यक्ती त्याच्यासोबत काही महिला व मुलांना घेऊन भंगार गोळा करत असल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून गणेश नक्कलवाड (वय ३८ वर्षे, रा. नंदी नगर, मुदखेड) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

३ आरोपींसह ४ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी गणेश नक्कलवाड याने गुन्ह्याची कबुली दिली आणि घरात लपवून ठेवलेला ३,०१,७००/- रुपयांचा चोरीचा माल पंचांसमक्ष काढून दिला. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या इतर आरोपींची नावेही त्याने निष्पन्न केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) गणेश साहेबराव नक्कलवाड (वय ३८ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. नंदी नगर, मुदखेड)
२) वैशाली रामचंद्र नक्कलवाड (वय २० वर्षे, व्यवसाय- मजुरी)
३) सावित्रीबाई प्रकाश पानकोळवाड (वय ३१ वर्षे, व्यवसाय- मजुरी)
(यांच्यासोबत गुन्ह्यात सामील असलेले इतर ४ विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.)

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाचे कौतुक

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर वैंजने (नांदेड शहर) आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक (परिविक्षाधीन) मा. श्री. शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश माळी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मरदोडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, आदनान पठाण, अंकुश कांबळे, मपोका गुळवे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. विनोद देशमुख करत आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी काला इलू’ तेलंगणातून गजाआड

Next Post

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved