aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, April 13, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, April 13, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

Aawaz Times by Aawaz Times
April 11, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ एप्रिल प्रतिनिधी
बाळंतपण असो, अपघात असो किंवा एखादी मोठी दुर्घटना… संकटाच्या वेळी देवदूतासारखी धावून येते ती म्हणजे ‘१०२’ क्रमांकाची रुग्णवाहिका. कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा रक्ताची नाती दूर पळत होती, तेव्हा हेच रुग्णवाहिका चालक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत होते. मात्र, इतकी महत्त्वाची सेवा बजावूनही आज १०२ रुग्णवाहिका चालकांचे आयुष्य मात्र अंधारातच आहे. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, हा त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रत्येक संकटात ‘१०२’ सज्ज

गर्भवती मातांना दवाखान्यात नेणे, प्रसूतीनंतर त्यांना सुखरूप घरी सोडणे, कुपोषित बालकांना उपचारार्थ हलवणे, विषबाधा किंवा सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने मदत पोहचवणे अशा अनेक कामांसाठी १०२ रुग्णवाहिका चोवीस तास सज्ज असते. केवळ आरोग्य सेवाच नाही, तर मंत्र्यांचे दौरे, व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुकीचे कामकाज, तहसील कार्यालयातील ड्युटी, दंगलीची परिस्थिती किंवा महापुरुषांच्या जयंत्यांसारखे मोठे कार्यक्रम, अशा प्रत्येक ठिकाणी १०२ रुग्णवाहिकेला पाचारण केले जाते.

वेळेवर पगार नाही, विम्याचे संरक्षण नाही

दुर्दैवाची बाब अशी की, इतकी महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या या वाहन चालकांना साधे हक्काचे वेतनही वेळेवर मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या गाडीतून दररोज शेकडो रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचतात, त्याच चालकांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारची ‘मेडिकल बिल’ सवलत उपलब्ध नाही. अपघाताची भीती उराशी बाळगून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणही देण्यात आलेले नाही.

कायमस्वरूपी नोकरीची प्रतीक्षा

अनेक वर्षांपासून हे चालक तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. आम्हाला कायमस्वरूपी कामाचा दर्जा मिळावा,ही त्यांची जुनी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर केवळ आश्वासने मिळत असल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासन एकीकडे आरोग्य व्यवस्था बळकट असल्याचे सांगते, मात्र या व्यवस्थेचा कणा असलेल्या वाहन चालकांचे शोषण थांबणार कधी? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आम्ही रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो, पण आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचं काय? पगार वेळेवर नाही आणि नोकरीची शाश्वती नाही. प्रशासनाने आमच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा.
प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

Next Post

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
आपलं नांदेड

महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
Next Post

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved