aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन भोवणार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा

Aawaz Times by Aawaz Times
May 20, 2026
in आपलं नांदेड
0
घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन भोवणार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड, २० मे प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आणि कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि ‘बल्क वेस्ट जनरेटर’ (BWG) संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून आपला परिसर स्वच्छ ठेवावा; अन्यथा थेट दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ निश्चित करण्यात आले असून, १ एप्रिल २०२६ पासून त्याची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे २०२६ रोजीच्या आदेशाची दखल घेत नांदेड जिल्ह्यात १४ मे २०२६ रोजी या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक ‘विशेष कक्ष’ देखील स्थापन करण्यात आला आहे.

नागरिकांनो सावधान! कचरा देताना ‘या’ ४ पद्धतींनी वर्गीकरण करणे बंधनकारक

नवीन नियमांनुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा घंटागाडीत देताना त्याचे ४ भागांत वर्गीकरण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांसाठी प्रशासनाने पुढील नियम जाहीर केले आहेत:

  • कचऱ्याचे वर्गीकरण: घरातील कचरा ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष देखभाल/घरगुती घातक कचरा अशा ४ वेगवेगळ्या पद्धतींनी वर्गीकरण करूनच घंटागाडीत द्यावा.
  • उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी: कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर कचरा जाळल्यास कारवाई होईल.
  • सार्वजनिक शिस्त: सार्वजनिक ठिकाणी किंवा नाल्यांमध्ये कचरा फेकण्यास सक्त मनाई आहे.
  • सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट: सॅनिटरी पॅड आणि डायपर व्यवस्थित कागदात गुंडाळूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे द्यावेत.
  • वैद्यकीय कचरा संदर्भात कडक नियम: घरगुती कचऱ्यामध्ये कोणताही वैद्यकीय किंवा घातक कचरा मिसळू नये.
  • रस्त्यावरील विक्रेते व व्यापाऱ्यांसाठी नियम: रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, व्यापारी यांनी उष्टे अन्न, डिस्पोजेबल प्लेट, ग्लास, कप, कॅन, नारळाचे कवच, पॅकेजिंग, पाउच इत्यादी कचरा थेट रस्त्यावर फेकू नये. त्यांनी वर्गीकरणानुसार हा कचरा साठवण्यासाठी वेगवेगळे डब्बे किंवा कंटेनर ठेवणे बंधनकारक आहे.

‘बल्क वेस्ट जनरेटर’ (BWG) साठी नियम काय?

नियम ६ अन्वये, खालील निकषांमध्ये बसणाऱ्या संस्थांना Bulk Waste Generator (BWG) घोषित करण्यात आले आहे:

  • रहिवासी सोसायटी, अपार्टमेंट, गृहनिर्माण संस्था, सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, रेल्वे-बस स्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मार्केट, मंगल कार्यालये, स्टेडियम इत्यादी.
  • ज्यांचे क्षेत्र २० हजार स्क्वेअर मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
  • जे दररोज ४० हजार लिटर पाणी वापरतात.
  • जे दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करतात.
    कारवाईचे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना:
    अशा सर्व BWG संस्थांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून, ओल्या कचऱ्यावर जागेवरच (On-site) प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. तसेच सॅनिटरी व सुका कचरा नगरपरिषद, मनपा किंवा अधिकृत एजन्सीकडे सुपूर्द करावा. जे BWG या नियमांकडे दुर्लक्ष करतील, त्यांचे पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याचे थेट अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे? (प्रशासनातर्फे मार्गदर्शिका)

सर्व नागरिकांच्या सोयीसाठी कचऱ्याचे वर्गीकरण खालील ४ प्रकारांत स्पष्ट करण्यात आले आहे: कचऱ्याचा प्रकार समाविष्ट असणाऱ्या वस्तू १. ओला कचरा खाद्यपदार्थांचे अवशेष (भाताचे पाणी, तेल, मसाले), भाजीपाला, फुलांच्या पाकळ्या व माळा, गवत, बागेतील कचरा (झाडांची छाटलेली छाटणी), कागदाचे बारीक अवशेष, दूध व दह्याचे पात्र, पशुखाद्य अवशेष इ. २. सुका कचरा प्लास्टिक (बाटल्या, पाउच, बॅग), कागद (वर्तमानपत्रे, पत्रिका, पुस्तके), धातू (ॲल्युमिनियम, स्टील, तांबे), काच (बाटल्या, काचेची पात्रे, खिडकीची काच), लाकडी वस्तू (फर्निचर, खोके), रबर (टायर, जोडे), जुने कपडे (साड्या, शर्ट) इ. ३. सॅनिटरी कचरा सॅनिटरी पॅड, डायपर, फेस मास्क, वाईप्स, हँडग्लोज, सॅनिटरी औषधांच्या रिकाम्या बाटल्या, ट्यूब, पाउच, संसर्गजन्य पदार्थ आणि औषधांचे अवशेष इ. ४. विशेष देखभाल / घातक कचरा बॅटरी (सेल, रिचार्ज करण्यायोग्य सेल), ट्यूबलाईट, पारायुक्त बल्ब, कीटकनाशके व खाद्यांचे अवशेष, ई-कचरा (जुने फोन, कॉम्प्युटरचे सुटे भाग), रासायनिक पदार्थ (पेंट, विषारी द्रव) इ. नांदेड जिल्ह्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिक संस्थांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियमोंचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कोणतीही गय केली जाणार नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यावरून स्पष्ट होते.

विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार

Next Post

ऑपरेशन यात्री सुरक्षा नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई तीन अट्टल चोरट्या गजाआड ४२ हजारांचे मोबाईल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post
ऑपरेशन यात्री सुरक्षा नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई तीन अट्टल चोरट्या गजाआड ४२ हजारांचे मोबाईल जप्त

ऑपरेशन यात्री सुरक्षा नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई तीन अट्टल चोरट्या गजाआड ४२ हजारांचे मोबाईल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved