aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, November 9, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, November 9, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये तलवारीसह दहशत माजवणारी टोळी जेरबंद विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
March 30, 2026
in क्राईम
0
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



नांदेड: ३० मार्च प्रतिनिधी

शहरात तलवारी आणि खंजर बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५२,५०० रुपये किमतीच्या दोन तलवारी, एक खंजर आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.
गुप्त माहितीवरून लावला सापळा
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी रात्रगस्त आणि सतर्कतेचे आदेश दिले आहेत. याच आदेशाचे पालन करत असताना २९ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. नाथनगर परिसरातील रोडवर तीन तरुण मोटारसायकलवर बसून शस्त्रांसह फिरत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांची धाडसी कारवाई
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून डी.बी. पथकाने दोन पंचासह नाथनगर परिसरात सापळा रचला. संशयास्पद रित्या आढळलेल्या तिन्ही तरुणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन तलवारी आणि एक धारदार खंजर मिळून आला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची ‘स्प्लेंडर’ मोटारसायकल (क्र. MH 26-CR-0803) आणि शस्त्रे असा एकूण ५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) चंदासिंग विठ्ठलसिंग चव्हाण (वय ३७ वर्षे, रा. कलंबर, ता. लोहा)
२) बालाजी उदयसिंग ठाकुर (वय २० वर्षे, रा. सांगवी-ब, नांदेड)
३) यश कल्याणसिंग ठाकुर (वय १९ वर्षे, रा. सांगवी-बु, नांदेड)
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अभिनाष कुमार  पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे, सपोनि संतोष जोंधळे, पोउपनि देशपांडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक राणे करत आहेत.
वृत्त संकलन:
प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्याला पुढील चार दिवस यलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Next Post

रेल्वेचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका नांदेड विभागात ७ दिवसांत ३५ फेरीवाल्यांवर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post

रेल्वेचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका नांदेड विभागात ७ दिवसांत ३५ फेरीवाल्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved