नांदेड २ ऑगस्ट ( प्रतिनिधी – माधव वाघमारे)
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जुलै २०२६ या एकाच महिन्यात मोठी धडक मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच न्यायालयीन खटल्यांमध्ये दोषसिद्धी मिळवून देण्यातही मोठे यश आले आहे.
अवैध धंद्यांवर कारवाईची आकडेवारी (१ जुलै ते ३१ जुलै २०२६)
जुलै महिन्यात जिल्ह्यात विविध अवैध धंद्यांवर केलेल्या धाडींमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदवून मुद्देमाल जप्त करण्यात आला: क्र. अवैध प्रकार दाखल गुन्हे आरोपी जप्त मुद्देमाल किंमत (रु.) १ रेती उपसा ४० ६५ ₹ १४,१९,३७,६६४/- २ गुटखा २६ ३४ ₹ ६०,८९,२४६/- ३ जुगार ८० ३२४ ₹ ४९,१०,३५०/- ४ दारूबंदी ३१७ ३३६ ₹ २६,३१,७९०/- ५ अंमली पदार्थ ०३ ०६ ₹ २५,७१,९५०/- ६ शस्त्र अधिनियम (३/२५ व ४/२५) २२ २० ०६ पिस्तूल, ०२ मॅगझीन, १७ शस्त्रे (तलवार/खंजीर/कुकरी) ७ ‘मेड इन पाकिस्तान’ कॉस्मेटीक ०१ ०२ ₹ ३९,६९,९४०/-
महत्वपूर्ण यश आणि कामगिरी
- मोबाईल रिकव्हरी मोहीम: ‘गहाळ मोबाईल हस्तगत करणे’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४७१ मोबाईल शोधून काढून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
- PITA कायद्यान्वये कारवाई: २ गुन्हे दाखल करून १३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ₹ २,३६,३१० चा मुद्देमाल जप्त करत ११ पीडितांची सुटका करण्यात आली.
- अपहरण गुन्हे उघडकीस (कलम 137(2) BNS): २८ मुली व २ मुलांच्या अपहाराचे प्रकरणे दाखल असून त्यापैकी १९ मुली व ०१ मुला शोधण्यात यश आले.
- बेपत्ता व्यक्तींचा शोध: ६१ महिला व ४९ पुरुष नोंद झालेल्यांपैकी २९ महिला व २२ पुरुषांचा यशस्वी शोध घेण्यात आला.
- दोषसिद्धी: ४ महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपींना शिक्षा मिळवून देत गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला.
उल्लेखनीय कारवाया
१. ‘Made in Pakistan’ सौंदर्यप्रसाधने जप्त: नांदेड शहर व इतवारा परिसरातील दुकानांवर कारवाई करत पाकिस्तान निर्मित बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा ₹ ३६,६९,९४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (गु.र.नं. 242/2026, कलम 123, 318(4) भारतीय न्याय संहिता 2023).
२. दागिने जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस: ३ जुलै २०२६ रोजी गादीपाल गल्लीतील सराफावर झालेली ३ किलो चांदीचे दागिने जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून ₹ ७,४१,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जनजागृती आणि गुन्हे प्रतिबंध उपक्रम
- मिशन कवच: शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी व महिला सुरक्षेबाबत जनजागृती.
- वाहतूक शिस्त: अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन व रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधन.
- सायबर गुन्हे जनजागृती: डिजिटल व्यवहार, OTP, PIN, QR कोड व UPI फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन.
- विशेष पथके सक्रिय: शहरात ‘अँटी थेट पेट्रोलिंग’, ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक’ आणि ‘दामिनी पथक’ द्वारे गर्दीच्या ठिकाणी व संवेदनशील भागात २४ तास विशेष गस्त घातली जात आहे.












