aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद २ लाख १५ हजार रुपयांच्या ४ गाड्या जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 3, 2026
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद २ लाख १५ हजार रुपयांच्या ४ गाड्या जप्त
0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  ३ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत २ आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून एकूण २ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ४ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वजीराबाद आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून रचला सापळा

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलभ रोहन यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रावली.
तपासादरम्यान, आरोपी शिवाजी उर्फ पवन दत्तराम वडजे (वय २३ वर्षे, रा. व्यंकटेशनगर, उमरी) हा चोरीची मोटारसायकल घेऊन शंकरराव चव्हाण उड्डाणपुलाजवळ येणार असल्याची अचूक माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलची पडताळणी केली असता, ती पोलीस ठाणे वजीराबाद (गु.र.नं. २२/२०२६ कलम ३०३ बी.एन.एस.) हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

शेतातील आखाड्यावर लपवून ठेवल्या होत्या गाड्या

आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने इतर मोटारसायकली लपवल्याची कबुली दिली. आरोपी महेश साहेबराव तोडे (वय २२ वर्षे, रा. अंतरगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) याच्या मदतीने चोरी केलेल्या इतर ३ मोटारसायकली अंतरगाव (ता. नायगाव) येथील शेतातील आखाड्यावर लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ महेश तोडे यास ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता तेथून ३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या २ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली खालील गुन्ह्यांशी संबंधित आहेत:
१) पोलीस ठाणे वजीराबाद – गु.र.नं. ३७८/२०२३ कलम ३७९ IPC
२) पोलीस ठाणे वजीराबाद – गु.र.नं. ४६१/२०२३ कलम ३७९ IPC
३) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण – गु.र.नं. ९२८/२०२४ कलम ३०३(२) बी.एन.एस.
४) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण – गु.र.नं. ४०३/२०२३ कलम ३७९ IPC
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक

ही उल्लेखनिय कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलभ रोहन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, मोहन हाक्के, महेश बडगु, लहू चाटे आणि आबाराव पिंगलवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई जुलै महिन्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

झुलेलाल मंदिर भवन येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड ५ जणांना अटक ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
झुलेलाल मंदिर भवन येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड ५ जणांना अटक ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

झुलेलाल मंदिर भवन येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड ५ जणांना अटक ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved