aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा धडाका ३ ठिकाणी धाडी टाकून २१ जुगारी अटकेत ६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
September 4, 2026
in क्राईम
0
नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा धडाका ३ ठिकाणी धाडी टाकून २१ जुगारी अटकेत ६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ४ सप्टेंबर/ प्रतिनिधी माधव वाघमारे

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने एकाच दिवशी धडक कारवाया करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. ‘कल्याण मटका’ व ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या एकूण २१ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, ७ मोटरसायकली, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण ६,६६,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा सविस्तर तपशील:

  • पहिली कारवाई (खुदबी नगर चौरस्ता, नांदेड): गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने हबिबिया कॉलनीसमोर छापा मारून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले. यात नासिरखान समशेरखान, शेख अनसार शेख अमीन, शेख शकील शेख इस्माईल, वाजिद खान रमजान खान, महम्मद आसिफ अकबर, वाजीद खान अमीरखान, माजीदखान नामीदखान, शेख गौस शेख हसन, उस्मान अहमद अली, महम्मद अफरोज महम्मद सुभान आणि शेख जमीर उर्फ अब्बू यांचा समावेश आहे. यांच्याकडून ४२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (गुन्हा रजि. क्र. १११३/२०२६).
  • दुसरी कारवाई (गोपाळचवडी, कॅनॉल रोड): पेट्रोलिंग दरम्यान कॅनॉल रोड लगतच्या मोकळ्या जागेत ‘तिर्रट’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ४ आरोपींना (शांतुअप्पा वैजनाथअप्पा मठपती, मोहन सिताराम राठोड, आनंदा नागोराव हैबतकर, अशोक अंबादास बनसोडे) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, ४ मोबाईल आणि ३ मोटरसायकली असा एकूण २,२५,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (गुन्हा रजि. क्र. १११४/२०२६).
  • तिसरी कारवाई (गोपाळचवडी, पाण्याच्या टाकीजवळ): पाण्याच्या टाकीच्या बाजूला मोकळ्या जागेत धाड टाकून पैसे लावून ‘तिर्रट’ खेळणाऱ्या ६ आरोपींना (कृष्णा दत्ता हैबतकर, गोरकनाथ चांदु गायकवाड, नामदेव तानाजी कोनापुरे, योगेश मोहनराव दुरनाळे, जालिंदर मारोजी नॅपनवाड, सुभाष गोविंद धसाडे) ताब्यात घेतले. या ठिकाणी ५ अँड्रॉइड मोबाईल व ४ मोटरसायकलींसह एकूण ३,९८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (गुन्हा रजि. क्र. १११५/२०२६).

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण आणि पोलीस अंमलदार माने, मुंडे, जमीर अहमाद, शंकर माळगे, शिरमलवार, जाधव, कारामुंगे, आसिफ व कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध धंद्यांविरोधात ही मोहीम अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी बेकायदेशीर हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका गोदावरी पात्रात धडक कारवाई करत २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नांदेड ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका गोदावरी पात्रात धडक कारवाई करत २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका गोदावरी पात्रात धडक कारवाई करत २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved