aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका गोदावरी पात्रात धडक कारवाई करत २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
September 5, 2026
in क्राईम
0
नांदेड ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका गोदावरी पात्रात धडक कारवाई करत २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी ५ सप्टेंबर| माधव वाघमारे

नांदेड: जिह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी पिंपळगाव व भनगी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी धडक कारवाई केली असून, तब्बल २ कोटी १६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला आहे.

रात्रगस्तीदरम्यान रचला सापळा दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पिंपळगाव ते वाडीपाटी रस्त्यावर सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त केले. यामध्ये टाटा हायवा (MH-26-CH-7086) आणि भारत बेंझ हायवा (MH-26-CH-2409) यांचा समावेश असून, प्रत्येकी ५ ब्रास रेतीसह एकूण ९० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रेती धक्क्यांवर छापा; पात्रात उड्या मारून माफिया फरार हायवा चालकांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तातडीने पिंपळगाव व भनगी येथील गोदावरी नदी पात्रातील रेती धक्क्यांवर धाड टाकली. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे इसम नदीच्या पाण्यात उड्या मारून पसार झाले.

घटनास्थळावरून जप्त व नष्ट केलेला मुद्देमाल:

  • फायबर बोटी (७): ४ मोठ्या फायबर बोटी (किंमत ₹८० लाख) व ३ लहान फायबर बोटी (किंमत ₹२१ लाख) – जागीच नष्ट.
  • वाळू उपसा इंजिन (३): किंमत ₹९ लाख – जागीच नष्ट.
  • तराफे व रेती: ३५ तराफे (किंमत ₹१७.५ लाख) व ७० ब्रास रेती (किंमत ₹३.५ लाख) – नदीत उलटवून व जाळून जागीच नष्ट.

गुन्हा दाखल व आरोपींवर कारवाई या कारवाईत ज्ञानेश्वर खंडू कोपनर (वय २१, रा. पांगरी), पिराजी रामदास आव्हाड (वय २२, रा. पेनूर), रेती धक्का मालक/चालक नारायण नरहरी पुंड व अर्जुन जगन्नाथ येवले यांच्यासह इतर ९ अनोळखी फरार इसमांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११२८/२०२६ (कलम ३०३(२), ३(५) BNS सह ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. ओमकांत चिंचोलकर, पोउपनि. व्यंकट कुसमे, आणि पोलीस अंमलदार जिवन तेलंग, भगवान टिपसरे, भिसे, गफार शेख, कल्याणकर व पवार यांनी पार पाडली.

अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा धडाका ३ ठिकाणी धाडी टाकून २१ जुगारी अटकेत ६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर विशेष पथकाची धडक कारवाई १८ जणांवर गुन्हे दाखल  साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर विशेष पथकाची धडक कारवाई १८ जणांवर गुन्हे दाखल  साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved