नांदेड ६ सप्टेंबर(प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी, लॅपटॉप आणि घरफोडीचे सत्र सुरू होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने कारवाई करत ३ सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
न्यायालयाच्या पाठीमागे रचला सापळा दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही संशयित विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून हिंगोली गेट ते कोर्टाच्या पाठीमागील रस्त्यावर फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने आंध्र समिती शाळेच्या भिंतीजवळ सापळा लावून एका निळ्या रंगाच्या दुचाकीवरील ३ संशयितांना ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपींची नावे:
- १) क्षितिज शरद कांबळे (वय २१, रा. प्रभातनगर, नांदेड)
- २) सुमेध गोपाळ लांबा (वय २३, रा. प्रभातनगर, नांदेड)
- ३) गोविंद मनोज खंडागळे (वय १८, रा. सम्राट अशोक नगर, नांदेड)
उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल:
- भाग्यानगर पो. स्टे. (गु.र.नं. ४७८/२०२६): बी.के. हॉल, श्रीनगर येथील बंद दुकानाचे शटर तोडून २ सोनी कॅमेरे (A6000 व M5) आणि १ लेन्स (किंमत ₹१,१५,०००/-) चोरीची कबुली.
- विमानतळ पो. स्टे. (गु.र.नं. ४०६/२०२६): घरासमोरून चोरलेली निळ्या रंगाची अॅक्टिव्हा स्कूटी (किंमत ₹४०,०००/-) जप्त. या गुन्ह्यात आरोपी यश तारु (सध्या फरार) याचाही समावेश आहे.
- भाग्यानगर पो. स्टे. (गु.र.नं. ४७०/२०२६): वेदांत येथील राज पार्कच्या पार्किंगमधून चोरीला गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त.
- पुण्यातील लॅपटॉप चोरी: आरोपी क्षितिज कांबळे याच्याकडून पुण्यातील हिंजवडी येथून चोरलेला DELL कंपनीचा Vostro 15 मॉडेलचा लॅपटॉप (किंमत ₹३०,०००/-) जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल आणि तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड आणि अंमलदार इम्रान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संतोष बेल्लुरोड, रवि हराळे, संदिप घोगरे, अमोल घेवारे यांच्या पथकाने पार पाडली.












