aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, November 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, November 8, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सोनाई नगर येथील कुंटणखान्यावर नांदेड पोलिसांचा छापा तीन पीडित महिलांची सुटका सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Aawaz Times by Aawaz Times
October 30, 2026
in क्राईम
0
सोनाई नगर येथील कुंटणखान्यावर नांदेड पोलिसांचा छापा तीन पीडित महिलांची सुटका सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दिनांक ३० ऑक्टोबर  (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, नांदेड अंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठी कारवाई करत शिवसाई अपार्टमेंट, सोनाई नगर, नांदेड येथे छुप्या मार्गाने चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्याचा (वेश्या व्यवसाय) पर्दाफाश केला आहे.

‘बोगस गिऱ्हाईक’ पाठवून लावला छापा: पोलिसांना मिळालेल्या खत्रीशीर माहितीनुसार, शिवसाई अपार्टमेंट, सोनाई नगर येथे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी शासकीय पंचसमक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला “बोगस गिऱ्हाईक” म्हणून त्याठिकाणी पाठवले. बोगस गिऱ्हाईकाने तिथे जाऊन वेश्यागमनासाठी इसम निश्चित करताच पोलिसांनी ठरल्याप्रमाणे इशारा केला आणि छापा टाकला.

सहा आरोपी निष्पन्न व तीन महिलांची सुटका: घटनास्थळावर खालील सहा आरोपी मिळून आले:

  • रणजितकौर अजय तिवारी (वय ५०, रा. सोनाईनगर, नांदेड)
  • धरमसिंग महीद्रसिंग अलग (वय ३१, रा. सोनाई नगर, नांदेड)
  • दत्ता हरी उमरे (वय ४०, रा. विद्युतनगर, नांदेड)
  • अशिष साहेबराव किर्तणे (वय २५, रा. सर्वोदय नगर, नांदेड)
  • मनोज नामदेव सुर्यवंशी (वय २२, रा. चैतन्य नगर, नांदेड)
  • महेश राजु वाघमारे (वय २५, रा. चिखलवाडी, नांदेड)

सदर कारवाईदरम्यान कुंटणखान्यातून एकूण तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, आरोपी या महिलांना पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने हा व्यवसाय करून घेत होते. घटनास्थळावरून वेश्यागमनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ३४,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल: या प्रकरणी वरील नमूद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गु.र.नं. ६२६/२०२६ कलम ४, ५, ६, ७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (ITPA) सह कलम १४३, ३(५) भान्यासं-२०२३ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वंजने यांच्या मार्गदर्शनखाली पोनि/अतुळ भोसले (स्थागुशा नांदेड), पोनि/संतोष तांबे (भाग्यनगर) व पोलीस अंमलदार ज्ञानोबा कवठेकर रितेश कुलथे गणेश लोसरवाड पो नि अश्विनी गायकवाड अच्युत मोरे यशोदा केंद्रे दीपा कवठेकर आणि (AHTU) पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मध्ये मंदिरात चोऱ्या करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

Next Post

DRM प्रदीप कामले यांच्याकडून पूर्णा येथील रेल्वे पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
DRM प्रदीप कामले यांच्याकडून पूर्णा येथील रेल्वे पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी

DRM प्रदीप कामले यांच्याकडून पूर्णा येथील रेल्वे पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved