नांदेड | १ फेब्रुवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे
बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट, सहयोग नगर, नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा भीम योद्धा पुरस्कार (तृतीय वर्ष) २०२६ दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे सायंकाळी ठीक ५.०० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला.
भीमा कोरेगाव शौर्य दिन व भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात एकूण ३० भीम योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय कार्य, धम्मकार्य व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय सेनेतील सेवानिवृत्त सैनिक, भारतीय बौद्ध महासभेतील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भिखू शीलरत्न थेरो यांच्या बुद्ध वंदना व पूजापाठाने झाली.
यावेळी विशेष उपस्थिती आद. इंजी. अशोकराव येरेकर, स्वागताध्यक्ष आद. इंजी. विनय घनबहादूर, प्रमुख पाहुणे आद. गणपतराव गायकवाड यांनी मार्गदर्शन करत भीम योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या व बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आद. इंजी. डी. डी. भालेराव, डॉ. वामनराव बहात्तरे, आद. ईश्वरराव जोंधळे, आद. प्रल्हादराव हिंगोले, आद. संजयराव निवडंगे, आद. रमेश दुधमल, आद. सुभाषदादा काटकांबळे, डॉ. भीमराव हाटकर, केंदीय शिक्षिका आद. लताताई शिंदे, आद. इंजी. भरत कांनिंदे, आद. पंढरीनाथ बोकारे, आद. सुरेश गजभारे, आद. सुरेश महाबळे, आद. अशोकराव जोंधळे, आद. क्रांतीकुमार पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक तथा बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे यांनी केले, तर आभार सचिव राजेश बिऱ्हाडे यांनी मानले.
भीम योद्धा पुरस्कार निवड समिती मध्ये आद. युवराज मोरे, आद. देवराव झगडे, आद. विजयकुमार उजेडकर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर, शहर व तालुका शाखांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सैनिक व वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत आणत स्टार प्रवाह छोटे उस्ताद फेम प्रसिद्ध गायिका अंजली गडपाळे व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सुरेश रंजवे यांच्या बुद्ध व भीम गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
पुरस्कार स्वीकारलेले मान्यवर
भारतीय सेनेतील सेवानिवृत्त मान्यवर :
दिगंबर सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, शनिदास नरवाडे, मनोहर गोवंदे, सुरेश रणवीर, भुजंग चांदणे, प्रकाश बुक्तरे, माधव पाटील, मारुती सोनकांबळे, गोदाजी गवळी.
समता सैनिक दल मान्यवर :
कुणाल दहिवले, चंदा कासले, रमेश वाघमारे, राजाराम साबळे, विलास आल्टे, सुधाकर गायकवाड, नारायण वाघमारे, सुभाष खाडे, देविदास लंकेश्वर, अमोल चंद्रे.
पोलीस दलातील सेवानिवृत्त मान्यवर :
सुधाकर वाघमारे, भीमराव थोरात, पंढरी अहंकारे, प्रकाश कापुरे, चंद्रमोहन जोंधळे, प्रकाश ढवळे, एकनाथ देवके, व्यंकटी येडके, नागोराव लोखंडे, सिताराम भगत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव राजेश बिऱ्हाडे, सहसचिव प्रवीण कुपटीकर, कोषाध्यक्ष सुभाष मल्हारे, सदस्य व भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचे पदाधिकारी तसेच माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.












