aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे त्रिसुवर्ण वर्चस्व तिन्ही वयोगटातील सुवर्ण यश अजित दादांना समर्पित

Aawaz Times by Aawaz Times
February 1, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | दि. १ फेब्रुवारी (प्रतिनिधी : माधव वाघमारे)

मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल स्पर्धा दि. 27 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे उत्साहात संपन्न झाली.

या स्पर्धेत 14 वर्षे मुले, 14 वर्षे मुली व 17 वर्षे मुली अशा तिन्ही वयोगटात महाराष्ट्र राज्याच्या संघाने सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधत देशपातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

🕯️ अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात मा. कै. अजीत पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक व्यक्त करत महाराष्ट्र संघाने जिंकलेली सर्व पदके त्यांना समर्पित करण्यात आली व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

🎤 मान्यवरांची उपस्थिती

बक्षीस वितरण समारंभास मोंटीसिंग जहागीरदार प्रमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड तथा निरीक्षक – एस.जी.एफ.आय.), सतिश इंगळे (अध्यक्ष, महाराष्ट्र नेटबॉल संघटना), विजय काकडे (तालुका क्रीडा अधिकारी), प्रवीण कुपटीकर (सचिव, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन), श्रीमती प्रिती (क्षेत्र अधिकारी, एस.जी.एफ.आय.) तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

🏆 अंतिम निकाल

  • 14 वर्षे मुले : 🥇 महाराष्ट्र | 🥈 मध्यप्रदेश | 🥉 विदयाभारती
  • 14 वर्षे मुली : 🥇 महाराष्ट्र | 🥈 कर्नाटक | 🥉 हरियाणा
  • 17 वर्षे मुली : 🥇 महाराष्ट्र | 🥈 राजस्थान | 🥉 गुजरात

🏃‍♀️🏃‍♂️ संघ व मार्गदर्शन

महाराष्ट्र संघाची तयारी मा. महादेव कसगावडे (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग) व मा. जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

  • 14 वर्षे मुले व मुली : क्रीडा मार्गदर्शक – समीर सिखीलकर, प्रवीण कुपटीकर | संघ व्यवस्थापक – संजय चव्हाण, रुकसाना मुलानी
  • 17 वर्षे मुली : क्रीडा मार्गदर्शक – निखील पोटदुखे | संघ व्यवस्थापक – महेशकुमार काळदाते

👥 महाराष्ट्र संघातील खेळाडू

14 वर्षे मुले : कार्तिक वाघ, निखिल राजपूत, यश पावडे, राज वाघ, साहिल मुलानी, साई गजभारे, अनमोल जाधव, विरोचन शिंदे, अनिरुद्ध लंगोटे, आयुष येरणे, धनुष झावरे
14 वर्षे मुली : भावना गावडे, सृष्टी गायकवाड, वेदिका तनपुरे, मोहिनी पडोळे, नंदिनी जगदेवे, अनुष्का गायकवाड, गीता कांबळे, ऋतुजा वाघ, समृद्धी पवार, दुर्वा दापले, रोशनी बनसोडे, रक्षिता बकवाड
17 वर्षे मुली : अक्षता कोकणे, विशालाक्षी राठी, नेत्रा कांसरा, अनुष्का चामलाटे, पूर्वश्री वाघ, सई इजाते, कविता नाईक, कुशी हलमारे, अश्विनी तांबारे, जिज्ञासा चौहान, जान्हवी आघाव, ईशा पाटील

⚖️ पंच व आयोजन सहकार्य

पंचप्रमुख म्हणून सतिश इंगळे यांनी काम पाहिले. तसेच लक्ष्मण दातीर, आकाश सरदार, विलास पराते, स्नेहदीप कोकाटे, हर्षवर्धन मगरे, शुभम मांजी, अभिषेक मुकाती, हैदारअली सय्यद, सचिन दांडगे, निलेश चौधरी, रोमदेव बाळपांडे, नरेश कळंबे, स्तुती पाटोळे, साक्षी पाटील, सुमेध गायकवाड, गणराज हेप्पट, अभिजीत देशमुख, ऋतुराज यादव, यश गायकवाड, प्रथमेश देरंगे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी, कर्मचारी, नेटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक व खेळाडूंनी मोलाचे सहकार्य केले, असे टेंभरे यांनी कळविले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नायगावात खळबळ  सहाय्यक अभियंत्याने कार्यालयात गळफास घेऊन संपवले जीवन मृत्यू आत्महत्या की घातपात

Next Post

३० भीम योद्ध्यांचा सन्मान  बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भीम योद्धा पुरस्कार २०२६ उत्साहात प्रदान

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

३० भीम योद्ध्यांचा सन्मान  बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भीम योद्धा पुरस्कार २०२६ उत्साहात प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved