aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, June 22, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, June 22, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन महिन्यांपासून फरार असलेला अट्टल आरोपी जेरबंद

Aawaz Times by Aawaz Times
June 7, 2026
in क्राईम
0
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन महिन्यांपासून फरार असलेला अट्टल आरोपी जेरबंद
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ०७ जून (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले असून, जबर दुखापत करून गंभीर जखमी करणाऱ्या आणि गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या एका पाहिजे असलेल्या अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पडली धाड

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गु.र.नं. ३१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. दिनांक ७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
या दरम्यान पथकाला गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, संबंधित गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी वाजेगाव येथील जामवाडी रोडवर थांबलेला आहे. माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करत जामवाडी रोड, वाजेगाव येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख महेबुब उर्फ गोरो पि. शेख बाबु (वय २९ वर्षे, रा. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे, वाजेगाव, ता. जि. नांदेड) असे आहे. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार शेख सोहेल उर्फ छोटा गुजर (रा. वाजेगाव) याच्यासह संगनमत करून फिर्यादीच्या मुलास खंजराने मारून गंभीर जखमी केल्याची कबुली दिली.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे व अग्निशस्त्राशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, तसेच पोलीस अंमलदार माधव माने, श्रीराम दासरे, मनोज राठोड आणि चापोका/सुधाकर देवकते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड एलसीबीची मोठी कारवाई MPDA कायद्यांतर्गत पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार सागर पवळे जेरबंद

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास खंडणी मागणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या
क्राईम

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत
क्राईम

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल
क्राईम

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

June 21, 2026
नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास खंडणी मागणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास खंडणी मागणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

बॅनरबाजीला फाटा विजयी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी पाळले नियमांचे कोंदण शहरात चर्चा आणि कौतुक

बॅनरबाजीला फाटा विजयी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी पाळले नियमांचे कोंदण शहरात चर्चा आणि कौतुक

June 22, 2026
नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved