aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

Aawaz Times by Aawaz Times
August 8, 2026
in महाराष्ट्र
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

८ ऑगस्ट प्रतिनिधी माधव वाघमारे

मुंबई: राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देऊन शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात या लाभ वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती आणि डिजिटल पारदर्शकता या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही योजना पूर्णपणे ऑनलाइन आणि सुलभ आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी महाआयटीच्या पोर्टलसह ग्रामपंचायत, बँक शाखा आणि सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘ॲग्रीस्टॅक’द्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नवीन खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.

विभागनिहाय लाभ वाटप तपशील

  • अमरावती विभाग: १,५८,१४६ शेतकरी (₹१,३७२.१७ कोटी)
  • नाशिक विभाग: १,४०,०८९ शेतकरी (₹१,२०९.३९ कोटी)
  • छत्रपती संभाजीनगर विभाग: १,३०,९३४ शेतकरी (₹९३२.६१ कोटी)
  • पुणे विभाग: १,०४,०६१ शेतकरी (₹८६०.९७ कोटी)
  • नागपूर विभाग: ७०,२९० शेतकरी (₹५४४.७१ कोटी)
  • कोकण विभाग: १८,६८७ शेतकरी (₹१०८.८६ कोटी)

सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड केला असून ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत १२.१० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित किंवा अडचण असलेल्या प्रकरणांवर मंत्रिमंडळ उपसमितीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

प्रशासनात पारदर्शकता आणि गती आणणार नांदेड जिल्हा परिषदेत ई-ऑफिस आणि बायोमेट्रिक प्रणाली लागू

Next Post

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम: महाराष्ट्रात voter enumeration चे ७८.८४% डिजिटायझेशन पूर्ण नांदेड जिल्ह्यात ८६.०२% काम संपन्न
महाराष्ट्र

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम: महाराष्ट्रात voter enumeration चे ७८.८४% डिजिटायझेशन पूर्ण नांदेड जिल्ह्यात ८६.०२% काम संपन्न

August 18, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) बोगस भरतीचा महाघोटाळा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिकाऱ्यांचा दरोडा
महाराष्ट्र

राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) बोगस भरतीचा महाघोटाळा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिकाऱ्यांचा दरोडा

August 17, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर १० लाईटहाऊस केंद्रांतर्फे जनजागृती रॅली उत्साहात
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर १० लाईटहाऊस केंद्रांतर्फे जनजागृती रॅली उत्साहात

August 16, 2026
ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे
महाराष्ट्र

ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे

June 5, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार
महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार

May 20, 2026
महाराष्ट्र

नांदेड विभागातील RPF ची कामगिरी ऑपरेशन नन्हे फरिश्ते

March 23, 2026
Next Post
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved