नांदेड २७ प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत निर्माण होणाऱ्या अफवांना पूर्णविराम देत, जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्हा पुरवठा विभागाने सद्यस्थितीतील इंधन साठ्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यात आगामी अनेक दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांकडे (OMCs) उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इंधन साठ्याची सद्यस्थिती (किमी. मध्ये)
पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑईल (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्यांकडे खालीलप्रमाणे साठा उपलब्ध आहे: अ.क्र. तेल कंपनी (OMC) उपलब्ध पेट्रोल साठा उपलब्ध डिझेल साठा सरासरी दैनिक विक्री (पेट्रोल) सरासरी दैनिक विक्री (डिझेल) १ IOCL ६८० ८८० ७२ १२२ २ HPCL ६०० १०५० १८५ ३५० ३ BPCL ३२७ ५३३ ९४ २४६ एकूण १६०७ २४६३ ३५१ ७१८ प्रमुख ठळक बाबी:
- मुबलक साठा: जिल्ह्यात सध्या एकूण १६०७ KL पेट्रोल आणि २४६३ KL डिझेल उपलब्ध आहे.
- दैनिक विक्रीचा ताळेबंद जिल्ह्याची दैनंदिन सरासरी विक्री पेट्रोलसाठी ३५१ KL आणि डिझेलसाठी ७१८ KL इतकी आहे. उपलब्ध साठा पाहता, इंधनाची कोणतीही कमतरता भासणार नाही.
- प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. पुरवठा साखळी सुरळीत असून सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसे इंधन उपलब्ध करून दिले जात आहे.
“जिल्ह्यात इंधनाचा साठा समाधानकारक आहे. पुरवठा विभाग सातत्याने तेल कंपन्यांच्या संपर्कात असून वितरणावर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही
जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड












