aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन लोहा तालुक्यातील धानोरा व पिंपळगाव ढगे येथे गृहभेटींची पाहणी

Aawaz Times by Aawaz Times
July 8, 2026
in आपलं नांदेड
0
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन लोहा तालुक्यातील धानोरा व पिंपळगाव ढगे येथे गृहभेटींची पाहणी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ८ जुलै (प्रतिनिधी) माधव वाघमारे
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेली विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेअंतर्गत गणना पत्रके भरण्यासाठी गृहभेटी देणाऱ्या बूथस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील धानोरा आणि पिंपळगाव ढगे या गावांना आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली, त्याप्रसंगी ते ग्रामस्थांशी संवाद साधत होते.

युवकांनी स्वयंसेवक म्हणून पुढाकार घ्यावा

भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या गृहभेटींच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावातील तरुण वर्गाने या राष्ट्रीय कामात पुढे येण्याची गरज अधोरेखित करताना ते म्हणाले की, ज्या गावांमध्ये एकाच समाजाची किंवा समान आडनावांची कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात, तिथे अचूकतेसाठी २० ते २५ स्थानिक युवकांचे स्वयंसेवक गट तयार केले जावेत. या युवकांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत गृहभेटी, मोहिमेची जनजागृती, गणना पत्रके विहित मुदतीत गोळा करणे आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी वेळेत पूर्ण करून घेणे या कामांना गती द्यावी.

प्रधानमंत्री आवास योजनेची पाहणी

या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केवळ मतदार यादी पुनरीक्षणाचाच नव्हे, तर ग्रामीण भागातील विकासकामांचाही आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना प्रत्यक्ष भेट दिली. घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली आणि घरकुलांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देशित केले.
या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, लोहाचे गट विकास अधिकारी कुलकर्णी, नायब तहसीलदार संदीप हडगे यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड दक्षिण मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला मोठा प्रतिसाद विशेष शिबिरांना नागरिकांची गर्दी

Next Post

देगलूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तेलंगणातून अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेची अवघ्या ४ तासांत सुटका

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post
देगलूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तेलंगणातून अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेची अवघ्या ४ तासांत सुटका

देगलूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तेलंगणातून अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेची अवघ्या ४ तासांत सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved