aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मी मतदान करणारच शंभर टक्के मतदानासाठी महापालिकेत स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन

Aawaz Times by Aawaz Times
December 31, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड, दि. ३१ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे

आगामी महापालिका निवडणुकीत शहरात शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात ‘मी मतदान करणारच’ या संकल्पनेवर आधारित मतदान संकल्प स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली असून, या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. डोईफोडे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून तो प्रभावीपणे वापरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य, कार्यक्षम व समाजाभिमुख प्रतिनिधी निवडण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी सहल, प्रवास किंवा उदासीनता न दाखवता प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा.”

मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे. ही लोकशाही अधिक सक्षम ठेवण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मतदानासाठी पुढाकार घेऊन समाजात सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटसारखे उपक्रम मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निरीक्षक महेंद्रकुमार कांबळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व निलेश सुकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, नितीन गाढवे, स. अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकळीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठ्ठे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, शिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, भांडारपाल नागनाथ पतंगे, स्वीय सहाय्यक महेश आसणे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सेल्फी पॉइंटद्वारे नागरिक, अधिकारी व कर्मचारी ‘मी मतदान करणारच’ असा संकल्प करून सेल्फी घेऊन तो संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणार असून, त्यामुळे शहरात मतदानाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस दलातील ७ अधिकारी अंमलदार सन्मानाने सेवेतून निवृत्त

Next Post

वाळू तस्करीविरोधात नांदेड पोलिसांचा कडक प्रहार एमपीडीए अंतर्गत आणखी एका गुन्हेगाराला स्थानबद्ध

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

वाळू तस्करीविरोधात नांदेड पोलिसांचा कडक प्रहार एमपीडीए अंतर्गत आणखी एका गुन्हेगाराला स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved