aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेडमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची धडक कारवाई बिल्डरसह कंत्राटदारावर गुन्हे दाखल

Aawaz Times by Aawaz Times
May 19, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेडमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची धडक कारवाई बिल्डरसह कंत्राटदारावर गुन्हे दाखल
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १९ मे ( प्रतिनिधी माधव वाघमारे)

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरुद्ध नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मंगळवारी (दि. १९ मे) धडक मोहीम राबवली. या मोहिमेत शिवाजी नगर आणि कौठा परिक्षेत्रात अनधिकृतपणे बॅनर लावल्याप्रकरणी खाजगी बिल्डर, कंत्राटदार यांच्यासह बॅनर तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनपा हद्दीत जाहिरात फलक लावण्यासाठी महानगरपालिकेने एकूण ११८ ठिकाणे निश्चित केली असून, तिथे ठराविक आकाराच्या फ्रेमही बसवल्या आहेत. या निर्धारित जागेवर पालिकेचे शुल्क भरून नागरिकांना किंवा स्वयंसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावण्याची मुभा आहे. असे असतानाही, शहरात ठिकठिकाणी विनापरवानगी बॅनर लावून शहर विद्रुपीकरण केले जात असल्याचे मंगळवारी प्रशासनाच्या निदर्शनास आले.

भाग्यनगर पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल

शिवाजी नगर भागातील बजाज नगर येथे ‘धवन रेसीडन्सी’ या खाजगी बिल्डरचे बॅनर विनापरवानगी लावल्याचे आढळून आले. याप्रकरणी महाराष्ट्र विद्रुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्याबद्दल मनपाने कडक पाऊल उचलले आहे. याप्रकरणी अनिल दिलीप यादव, गणेश कटकम (कंत्राटदार) आणि विशाल माठी यांच्यासह बॅनर तयार करणाऱ्या व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (FIR No. ०२७०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

कौठा भागातही कारवाईची प्रक्रिया सुरू

शिवाजी नगर परिसरासोबतच कौठा भागातील मुख्य रस्त्यालगत देखील अनधिकृत बॅनर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेचे आवाहन:
“शहरातील नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि बिल्डर्सनी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळांवरच रीतसर परवानगी व शुल्क भरून होर्डिंग्ज लावावेत. अनधिकृत जाहिरात फलक लावून शहराचे सौंदर्य खराब करू नये आणि महापालिकेला सहकार्य करावे.”
— महानगरपालिका प्रशासन

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

ही धडक कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शिवाजी नगर विभागीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, दत्ता कल्याणकर व त्यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला. महापालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनधिकृत होर्डिंगबाजांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्हा निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी

Next Post

पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅक डाऊन ला यश  तरुणाकडून शस्त्रासारखे पिस्तुल लाइटर जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post
पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅक डाऊन ला यश  तरुणाकडून शस्त्रासारखे पिस्तुल लाइटर जप्त

पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅक डाऊन ला यश  तरुणाकडून शस्त्रासारखे पिस्तुल लाइटर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved