aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या फरार पतीला मुखेड पोलिसांनी अवघ्या ५ तासांत ठोकल्या बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
April 6, 2026
in क्राईम
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुखेड (नांदेड) ६ एप्रिल  प्रतिनिधी

घरगुती वादातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून करणाऱ्या नराधम पतीला मुखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. गुन्हा केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत शेत शिवारातून ताब्यात घेतले. मारोती रामकिशन उर्फ बाबाराव खांडेकर (वय ३५ वर्षे, रा. कर्णा, ता. मुखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील कर्णा येथील स्वाती मारोती खांडेकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी (दि. ६ एप्रिल) सकाळी ८ वाजेच्या सुमारास गुप्तबातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे पाठवण्यात आला.
कौटुंबिक वादातून संपवले आयुष्य
मयत स्वाती यांचा भाऊ योगेश गणपत देवकत्ते (वय २७, रा. एकलारा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी मारोती हा पत्नीसोबत वारंवार भांडण करत असे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. याच वादाच्या भरात संतापलेल्या मारोतीने पत्नी स्वाती यांचा साडीने गळा आवळून खून केला आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.
पाच तासांत पोलिसांची यशस्वी कारवाई
घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. मुखेड पोलिसांनी तांत्रिक मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. शेत शिवारात सुमारे तीन ते चार तास शोधमोहीम राबवून पोलिसांनी आरोपी मारोती खांडेकर याला बेड्या ठोकल्या.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), सुरज गुरव (नांदेड), उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सपोनि जावेद शेख, उपनिरीक्षक गणेश माने, अभिजित तुतुरवाड, संदीप यामावार आणि त्यांच्या पथकाने केली. सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचेही या तपास कार्यात सहकार्य लाभले.
पोलिसांच्या या तत्परतेबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

भारत एक सनातन राष्ट्र

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved